म्हसळा, श्रीवर्धनकरांची वाट दिशाहीन ; पर्यटकांची मोठी गैरसोय : दिशादर्शक फलक नकाशा लावण्याची मागणी



गणेश प्रभाळे : दिघी 
पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिशादर्शक फलकांची दयनीय अवस्था झाली असून जे सुस्थितीत आहेत त्यावर जाहिरातींचे फलक झळकत आहेत तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे पहावयास मिळत आहे माणगाव , महाड , मुरुड , म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील इतर महत्वाची पर्यटनस्थळे जोडणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलकच नाही . शिवाय असलेल्या दिशादर्शक फलकांची सध्या दयनीय अवस्था झालेली आहे काही ठिकाणी फलक जमीनदोस्त झालेले आहेत . तर अनेक ठिकाणी या फलकांवर जाहिरातींचे फलक झळकत आहेत . त्यामुळे तालुक्यात येणार्या पर्यटकांची दिशाभूल होऊन पर्यटक व भाविक भरकटत असल्याचे पहावयास मिळत आहे मुरुडवरुन दिघी मार्गे, लोणेरेवरून गोरेगाव मार्गे , माणगाववरून साई मार्गे , दापोलीवरून हरिहरेश्वर तसेच आंबेत मागें पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत . योग्य असतात दिशादर्शक फलक नसल्याने स्थानिकांना विचारत श्रीवर्धन कडे येत असतात . मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे रस्त्याच्या दुतर्फ वाढलेले गवत व रान , वनस्पती रस्त्यावर येत आहेत . रस्त्याकडेची झाडेझुडुपे तोडली फांद्याआड नसल्यामुळे मार्गदर्शक फलक झाडांच्या लपलेले आहेत . हे फलक न दिसल्याने वाहन चालकांची व पर्यटकांची दिशाभूलदेखील होत आहे पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी दिशादर्शक फलक महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात पर्यटकांना सोयीचे असणारे श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील दिशादर्शक फलक दिशाहीन कडेला पडलेले आहेत असून रस्त्याच्या . या फलकांची वेळेत डागडुजी न केल्याने ते सध्या शेवटची घटका मोजत असल्याचे दिसते आहे . दरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन क्षेत्राचा विस्तार मोठा आहे त्यामुळे वर्षाकाठी तालुक्यात येणार्या पर्यटकांची संख्या सुमारे लाखावर आहे . संपूर्ण देशातून तालुक्यामधील प्रेक्षणिय स्थळे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते . मात्र येथील रस्त्यावर असलेली दिशादर्शक फलके पाहून येणाच्या पाहुण्यांची दमछाक होत आहे . कित्येक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने परजिल्ह्यातील तसेच पर्यटकांची दिशाभूल होऊन आडवळणी प्रवास करावा लागत आहे 

पर्यटनाचा नकाशा असावा...
पर्यटकांची दिशाभूल होऊ नये यासाठी अंतर्गत भागात तात्पुरत्या फलकांवर आजूबाजूला असलेल्या ठिकाणांची माहिती नकाशाच्या माध्यमातून दर्शवली जावी . किती किलोमीटरवर कुठले ठिकाण , तिथे कसे जाता येईल , असा संपूर्ण तपशील उपलब्ध व्हावा , अशी मागणी पर्यटक करत आहेत . 

मी पुणे येथून दिवेआगर पर्यटन स्थळी भेट देण्यास आलो . मात्र , ज्या मार्गावर उपरस्ते मिळतात अशा मूळ ठिकाणी दिवेआगर पोहचण्यासाठी दिशादर्शक फलक नसल्याने मला जवळजवळ अर्धा तास चुकीचा प्रवास करण्यात वेळ गेला . आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला . - समीर बागुल , पर्यटक पुणे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा