श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील दिघी ते वडवली महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा संपन्न


शनिवार दिनांक 17 नोव्हेंबर 2018 रोजी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील श्रीवर्धन तालुक्यात महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा दिघी ते वडवली या परिसरामध्ये काढण्यात आली. यामध्ये सकाळी 8.30 वाजता मौजे दिघी येथील ग्रामपंचायत कार्यालय, दिघी जेट्टी व दिघी गावात स्वच्छता करण्यात आली व दिघी येथील नागरिकांशी संवाद साधन्यात आला यानंतर मौजे कुडग़ांव येथे स्वच्छता करून तेथील लोकांशी संवाद साधन्यात आला.   या कार्यक्रमाचे औचित्य साधुन मा. आमदार. श्री. प्रवीणभाऊ दरेकर यांच्या फंडातुन मंजूर केलेल्या रंगमंचाचे भूमिपूजन मा. श्री.कॄष्णा कोबनाक अध्यक्ष विधानसभा यांच्या हस्ते करण्यात आला. या भूमिपूजन सोहळा प्रसंगी वडवली ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
       मौजे सर्वे येथे पंतप्रधान उज्वला गॅस योजने अंतर्गत लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले.
       या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

     या कार्यक्रमाला मा. श्री.कृष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा, श्री.प्रशांत शिंदे तालुका अध्यक्ष श्रीवर्धन, सौ.सरोज म्हशीलकर जिल्हा चिटणीस, श्री.दिनेश चोगले जिल्हा कार्यकारिणी सदस्य, श्री.मंगेश म्हशीलकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य,श्री.शैलेश पटेल तालुका अध्यक्ष म्हसला, श्री.आशुतोष पाटील तालुका सरचिटणीस, श्री.मंगेश शिगवन तालुका सरचिटणीस, श्रीशैलेश खापनकर शहर अध्यक्ष, श्री.तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस म्हसळा, श्री.मंगेश मुंडे शहर अध्यक्ष म्हसळा,श्री.भालचंद्र करड़े तालुका उपाध्यक्ष म्हसळा, सौ.आरती मांजरेकर तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, श्री.जयदीप तांबूटकर तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, सौ.मनीषा श्रीवर्धनकर शहर अध्यक्ष महिला, श्री.अविनाश हातिसकर गट अध्यक्ष, श्री.श्याम धुमाल श्री.महादेव बेंडूक, श्री.मंगेश गुणाजी, सौ.वनिता चिकाटी श्री.नीलेश पाटील, श्री.साहिल रहाटे, श्री.तन्मय पाटील, श्री. अजिंक्य भाटकर, श्री.सुनित पेडणेकर, श्री.राकेश शेलके, ओमकार पाटील, श्री.किसन रहाटे, श्री.महेंद्र लाड व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा