श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील अल्पवयीन 16 वर्षीय मुलीवर करण्यात आलेल्या शारीरिक अत्याचार प्रकरणी अति. सत्र न्यायालयाने आरोपी वसंत शंकर वाघमारे यास दोषी ठरवत भा. द .वि .स.366 अ अनव्ये दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे .
पीडित मुलीवर आरोपी वाघमारे याने नोव्हेंबर 2016 ते 17 मे 2017 या कालावधीत शारीरिक बळाचा वापर करून ,आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला .पीडित मुलीच्या घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने सदरचे कृत्य केले .पीडित मुलगी शारीरिक अत्याचार मुळे गरोदर राहिली हे संबधित आरोपीस समजल्या नंतर त्याने तिला गर्भपात करण्यासाठी गावठी औषध देण्यासाठी धारवली येथे आंब्याच्या वाडीत पळवून नेले त्या नंतर सदर प्रकरण उघड झाले .पीडित मुलीच्या साक्षीनुसार आरोपी वसंत शंकर वाघमारे यास सत्र न्यायालयाने 14नोव्हेंबर 2018 रोजी दोषी मानत भा. द. वि .स.कलम 376 अनव्ये सात वर्षे सक्तमजुरीची व 20,000 रु दंड न भरल्यास 2 महिने सक्तमजुरी, भा .द .वि .स कलम 363अनव्ये 7 वर्ष सक्तमजुरी व 20000 रु दंड न भरल्यास 2 महिने सक्त मजुरी भा. द. वि. स.366 अ अनव्ये10 वर्ष सक्तमजुरी ,भा. द.वि. स.506अनव्ये 20000 रु पोक्सो 03 सह 4 अनव्ये 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सत्र न्यायाधीश टी .एम .जहागिरदार यांनी सुनावली आली आहे .सदर गुन्हाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व सहा .पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केला आहे .सदर खटल्या मध्ये सरकार मार्फत वकील जितेंद्र म्हात्रे यांनी काम पाहिले .

Post a Comment