श्रीवर्धनच्या कराटे खेळाडूची दुबईत अभिमानास्पद कामगिरी : अविनाश मोरे ला सुवर्ण तर प्रसाद विचारे ला रौप्य पदक


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील चॅम्पियन्स कराटे क्लब च्या दोन खेळाडू नी अबू धाबी दुबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आपल्या खेळाची चमक दाखवली आहे. सदर स्पर्धेत भारत ,दुबई ,श्रीलंका , व नेपाळ या देशाच्या 502 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता .भारतातील महाराष्ट्र व केरळ राज्यातील खेळाडूंचा समावेश होता . 
श्रीवर्धन मध्ये 2005 पासून चॅम्पियन्स कराटे ची सुरुवात झाली आहे. दुबई स्पर्धेत यशस्वी  झालेले अविनाश मोरे व प्रसाद विचारे दोघे ही डबल ब्लॅक बेल्ट आहेत .त्यांना संतोष मोहिते यांनी प्रशिक्षण दिले आहे .
ग्रामीण भागातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर  दाखवलेली खेळाची चमक  निश्चितच सर्वसामान्य माणसाला आशादायी बनवणारी आहे .अपुऱ्या भौतिक सुविधा , योग्य मार्गदर्शनाची कमतरता या वर मात करत ग्रामीण भागातील खेळाडू विविध खेळात यशस्वी होत असल्याचे निदर्शनास येते आहे.क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळात खेळाडूंनी दाखवलेले नैपुण्य क्रीडा जगतास आल्हाददायक  आहे .

राष्ट्रीय ध्वज अभिमानाने फडकवत  मिळवलेले पदक आनंद देणारे आहेत .दुबई मधील स्पर्धा भविष्य काळात निश्चितच दिशा दर्शक ठरेल याची खात्री आहे .
 -अविनाश मोरे (सुवर्णपदक विजेता खेळाडू श्रीवर्धन )


आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकल्याचा आनंद आहे .मी 2005 पासून कराटे शिकण्यास सुरुवात केली होती .गेल्या वर्षी पासून सदर स्पर्धेची तयार करत होते .कठोर मेहनतची आज फलप्राप्ती झाली आहे .
-प्रसाद विचारे (रौप्यपदक विजेता खेळाडू )


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा