भारताचे माजी केंद्रीय आरोग्यमंत्री व अल्पसंख्याक मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कोकणचे भाग्यविधाते रायगडचे सुपुत्र कै.ए.आर.अंतुले साहेब यांनी स्थापन केलेल्या म्हसळा येथील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारताचे संविधान आणि आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधुन प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनींनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले तसेच २६ /११ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले पोलीस कर्मचारी शहिद हेमंत करकरे,शहिद अशोक कामटे,शहिद विजय साळसकर,शहिद उन्नी कृष्णन आणि पाकिस्तानचा क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडुन देऊन आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या कार्याची आठवण म्हणुन महाविद्यालयात त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला या दोन्हीही कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी बहूसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.राघव राव सर हे होते.कार्यक्रम च्या सुरुवातीस सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी आपल्या प्रस्ताविकात भारताचे संविधान कश्याप्रकारे अस्तित्वात आली,संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीतील इतर सदस्याचे असणारे योगदान देशाने २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधानाची स्विकृती केलेली असताना ते २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात का आणले याविषयी तसेच २६/११ च्या हल्ल्यात शहिद झालेल्या शहिदांच्या कार्याची माहिती दिली त्यानंतर महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.जाधव एम.एस.यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले तर व्यवसायिक अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.कानिफ भोसले यांनी संंविधानाची रचना,तसेच इतर देशातील संविधान आणि भारतीय संविधान यातील तुलनात्मक फरक विविध दाखल्याच्या आधारे विद्यार्थ्यांना उलगडून दाखवित असतानाच परकिय देश भारतात अतिरेकी कारवाया का घडवून आणु इच्छीतात आणि या कारवाया रोखण्यासाठी महाविद्यालयीन युवकयुवती आणि देशाचे नागरीक म्हणुन आपण काय करू शकतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी एम.काँम.मधिल विद्यार्थी श्री.आकाश साळवे यांने आभार मानले कार्यक्रमच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.आकाश साळवे आणि तृतीय व व्दितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले
वसंतराव नाईक महाविद्यालयात संविधान दिन आणि २६/ ११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन
Admin Team
0

Post a Comment