म्हसळा प्रतिनिधी
दिघी माणगाव पुणे या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे माणगाव - म्हसळा- दिघी या मुख्य टप्प्यांत राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ महामार्गालगतच्या शेतकऱ्यांची फसवणुक करीत आहे आसा दावा म्हसळा तालुका काँग्रेस ( आय) चे अध्यक्ष डॉ. मुईज शेख यानी पत्रकार परीषदेत केला. यावेळी रफी घरटकर, शब्बीर बशारत, अकमल कादीरी , चांदले व शेतकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC) माणगाव- म्हसळा- दिघी या मार्गावर दोन पदरी रस्त्याचे काम करीत आहे . सदरचे काम हे बेदरकार सुरु आसल्याने मागील दोन वर्षांत सदोष कामामुळे असंख्य अपघात झाले त्यामध्ये अनेकाना अपंगत्व, दुखापती झाल्या आहेत. त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळावी , अनेक रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमीनी बेकायदेशीर पणे अधिग्रहण केल्या आहेत, रस्ते विकास करताना शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान , बेदरकारपणे केलेली वृक्ष तोड याबाबत कॉंग्रेस पक्ष आंदोलन छेडणार आहे .कॉंग्रेसचे आंदोलन हे माणगाव , म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. महामार्गालगतच्या अधीग्रहीत होणाऱ्या जमीनीना नवीन निकषा प्रमाणे भाव मिळाला पाहीजे व अन्य मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन रहाणार आहे असे शेख यानी सांगितले .
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC) च्या असंख्य चुका .
◆ शासनाने १९७२ साली सदरच्या रस्त्यालगतच्या जमीन अधीग्रहीत केल्या , १९७४ साली जमीन मालकाना Payment दिले . आज तब्बल ४६ वर्षानी शासन झोपेतून उठले, जमीन अधीगृहीत केल्यापासून ११ वर्षा पर्यंत त्या वापरांत याव्या अन्यथा त्या जमीनी शेतकऱ्यांच्या मालकीच्याच रहातात असा कायदा आस ल्याचे सांगत , सर्वोच्य न्यायालयानी असा निकाल दिला आसल्याचे शेख यानी सांगितले.
◆ या मार्गावर गागा अधिग्रहण करण्या अगोदर मोठ- मोठया मोऱ्यांचे काम अनेक ठीकाणी जमीन मालकांवर दहशत निर्माण करून केले जात आहे याबाबत दाद मागण्यात येणार आसल्याचे शेख यानी सांगितले.

Post a Comment