प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
शेतकरी कामगार पक्षाला म्हसळा तालुक्यात गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला महत्व देवून प्रत्येक गावात ग्रामचिटणीस मंडळ स्थापन करण्याचा ठराव तालुका चिटणीस मंडळ विस्तारीत सभेत करण्यात आला. यावेळी तालुका चिटणीस संतोष पाटील,जेष्ठ नेते परशुराम मांदाडकर,आर डी सी बँक माजी संचालक श्रीपत धोकटे,आर डी सी बँक संचालक तुकाराम महाडीक,जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक गिजे,राजाराम धुमाळ,युवक अध्यक्ष निलेश मांदाडकर,गोंडघर सरपंच स्वप्नील बिराडी,महिला आघाडी अध्यक्षा सुलोचना लोणशीकर,संतोष धुमाळ,एकनाथ खामगावकर,हेमंत पयेर जितेंद्र गिजे, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील व म्हसळा तालुका संपर्क चिटणीस आमदार पंडितशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणार्या ग्रामपंचायत ,लोकसभा व विधानसभा निवडणुकी अनुषंगाने कार्यकर्त्यांचे बूथ पातळीवर नियोजन करण्यात आले असून तालुका चिटणीस मंडळ,तालुका युवक संघटना,विद्यार्थी संघटना, पक्षांतर्गत विविध सेलसह जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य व जिल्हास्तरिय अन्य पक्ष संघटनेत तालुक्यातील पदाधिकार्यांची निवड करण्यात आली . नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पक्षाच्या आगामी कार्यकर्ता मेळाव्यात निवड पत्र देण्यात येणार असल्याचे संतोष पाटील यांनी संगितले. गाव पातळीवरील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी निर्णय घेण्यात यावेत तसेच वरिष्ठ पातळीवर होणार्या युत्या व आघाड्यांमुळे तालुक्यात पक्षाची पिछेहाट होत आहे. आघाडीतील मित्र पक्ष सातत्याने सापत्न्य वागणूक देत असून येणार्या निवडणुकांमध्ये तालुक्यात वेगळी भूमिका मांडण्याची गरज अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment