टीम म्हसळा लाईव्ह
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे परम मित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री , कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए. आर.अंतुले यांचे सुपुत्र श्री. नाविद अंतुले यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री शिवसेना नेते श्री.अनंत गीते साहेब यांची मुंबई विलेपार्ले येथील कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान आंबेतच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी म्हसळा शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिर्के, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुविज शेख साहेब उपतालुका प्रमुख अनंतभाई कांबळे, राजू सावंत,रफिक घरटकर,चंदू सावंत , अशोक सावंत,शिवसेना ता. म्हसळे(मुंबई) सहसंपर्क प्रमुख श्री.अनिल काप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment