फोटो: नवनियुक्त अध्यक्ष महादेव पाटील व अन्य पदाधिकारी
संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा तालुका हिंदू सघटनेच्या अध्यक्षपदी १८ गाव अगरी समाज अध्यक्ष व म्हसळा पं .स.चे माजी सभापती महादेव पाटील यांची तीन वर्षाच्या कार्यकाला साठी बिनविरोध निवड झाली. म्हसळा ग्रामदैवत श्री धावीरमंदीरात झालेल्या सभेत व माजी अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेठ करडे यांचे अध्यक्षपदाचा नियतकाल संपत्यामुळे पुढील तीन वर्षाच्या कार्यकालासाठी पाटील यांची व कार्याध्यक्ष पदी जेष्ठ समाजसेवक श्रीपत धोकटे यांची एकमताने निवड झाली.यावेळी सभेला बाळशेठ करडे माजी अध्यक्ष,दिलीप कांबळे (सचिव), सुनील उमरोटकर, सहसचिव महेश पवार, अनिल महामुनकार
किरण पालांडे, निलेश मांदाडकर,अनिल बसवत,गजानन गिजे, गणेश बोर्ले,मंगेश म्हशीलकर,उपसभापती संदीप चाचले, मधुकर गायकर,समीर बनकर,बाबू बनकर,गणेश हेगीष्टे,अनिकेत पानसरे,रमेश डोलकर,मधुकर पाटील,बाबू शिर्के,सुधीर नाक्ती,भालचंद्र गणेकर,मुकेश कांबळे, जयदास कांबळे, मनोज नाक्ती,जनार्दन गाणेकर, हरी भायदे,रामचंद्र भुवड,सुधाकर जंगम,महेश पाटील ,श्रीपद मनवे इत्यादी सदस्य उपस्थित होते.
तालुक्यातील प्रत्येक गाव -वाडीतील अंर्तगत चालीरीती, सामाजिक रचना तशीच ठेऊन याच संस्कृतीच्या विचार सूत्रांतून म्हसळा तालुका हिंदू संघटनेचे अस्तीत्व व निर्मीती झाली आहे . विचार प्रणाली, जीवन प्रणाली, उपासना -भक्ती प्रणाली या त्रीसूत्रांचे माध्यमांतून तालुक्याचे सामाजीक संघटन समृद्ध व सकारात्मक विचारांचे ताकदवान रहाणार आहे .सार्वजनीक विश्वस्त अधीनीयम नुसार तालुका हिंदू संघटनेची नोंदणी करणार आहोत.
- महादेव पाटील , अध्यक्ष म्हसळा तालुका हिंदू संघटना.


Post a Comment