म्हसळा नगरपंचायत ची पुन्हा एकदा अतिक्रमणे हटाव मोहीम, दिघी नाका ते बाजार पेठ मधील अवैध दुकाने हटवली, मुख्याधिकारी वैभव गारवे यांची धडक कारवाई
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा नगरपंचायत ने काल(१६ नोव्हेंबर )पुन्हा एकदा अतिक्रमणे हटाव मोहीम हाती घेतली, यामध्ये दिघी नाका ते बाझार पेठ मधील अवैध दुकाने हटविण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा शहरातील बाजारपेठेतील रहदारीचा रस्ता हा अवैध दुकानांमुळे दिवसेंदिवस अरुंद होत चालला आहे. म्हसळा शहरात मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली की पर्यायी मार्ग असलेल्या या रस्त्यावर अवैध दुकानांमुळे दुचाकी , तीन चाकी तसेच लहान चार चाकी वाहनाना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे या वाहनचालकांसोबत बाजारपेठे मध्ये ये-जा करणाऱ्या नागरीकाना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही दुकाने थेट दुकान गाळे असणाऱ्या दुकानदारांच्या समोरच थाटली गेल्याने मूळ दुकानदारांचा व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली होती. याबाबत बाधित दुकानदारांनी म्हसळा नगरपंचायत चे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे अनेकदा लेखी तक्रारीदेखील केल्या होत्या. गेली अनेक महिने हे बाधित दुकानदार सदर अवैध दुकान थाटलेल्या दुकानदारांवर कारवाईच्या प्रतीक्षेत होते त्याना काल(१३ नोव्हेंबर) न्याय मिळाला. या सर्व कारवाईनंतर म्हसला बाजार पेठ देखील मोकळा श्वास घेत असल्याचे भासत होते. या कारवाई मध्ये ६ ते ७ हातगाड्या जप्त करण्यात आल्य असून १५ – १६ दुकानांचे अवैध बांधकाम पाडून टाकण्यात आले आहे. नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर सहा महिन्यातच एस.टी. स्टँड वरील तब्बल ८० दुकाने हटविण्यात आली होती त्यानंतर काल झालेली अवैध दुकानांवरील हि सगळ्यात मोठी कारवाई आहे.
मी गेले तीन चार महिने आमच्या दुकानासमोर अवैध रीत्या थाटलेल्या दुकानांना हटविण्यासाठी तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे करत होतो. आमचा व्यवसाय संपूर्ण ठप्प झाला होता परंतु याची दखल आज मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घेतली त्याबद्दल त्यांचे आभार.
-शाहनवाझ घरटकर, बाधित दुकानदार
दिघी – नाका ते बाझारपेठ येथील अनेक अवैध दुकानांबाबत लेखी तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने ६ – ७ हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून १५ – १६ दुकानांची अवैध बांधकामे पाडून टाकण्यात आली आहेत.
-वैभव गारवे, मुख्याधिकारी , नगरपंचायत, म्हसळा

Post a Comment