● पोलीस व संगणक परीचालकांमध्ये झटापटी
● मोर्चा दडपण्याचा शासनाचा प्रयत्न - राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांचा शासनावर घणाघात
● 18261 संगणक परिचालक मोर्चाला उपस्थित मुंडे यांची माहिती
● आंदोलकांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट नाकारली
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राज्यातील हजारोच्या संख्येने मुंबईत भायखळा ते आझाद मैदानात आपल्या मागणी साठी 27 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली विधाभवणार धडक मोर्चा घेऊन आलेले संगणक परिचालक व पोलीस यांच्यात सुरुवातीलाच झटापटी झाली काही काळ वातावरण तंग झाल्यानंतर पोलीस व संघटनेचे अध्यक्ष आणि कमिटी यांच्या सलोख्याने पायी मोर्चा न काढता पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पोलीस व्हॅन मधून आझाद मैदानात सोडले. संगणक परीचालकांच्या गर्दीने आणि घोषणांनी व जबरदस्त एकीने मुंबई जाम झाली असून मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय दिल्या शिवाय एकही संगणक परिचालक आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार केलेल्या संगणक परीचालकांच्या मोर्चाने मुंबई जाम झाली असून ही कोंडी सोडविण्यासाठी सरकारला घाम फुटलंय अशी अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे युवा शक्तीच्या या मोर्चाने शासनाची नाचक्की झाल्याने हा धडक मोर्चा दडपण्याचा प्रयत्न शासन करीत आहे असे संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.सिद्धेश्वर मुंडे यांनी मोर्चातील संगणक परीचालकांना संबोधित करताना सांगितले आहे.
राज्यात प्रत्येक ग्रामपंचायत मधे आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत काम करणाऱ्या संगणक परीचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळमधे सर्व संगणक परीचालकांना समाविष्ट करून घेण्याचा मागणीसाठी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. त्याच बरोबर अनेक वेळा मोर्चा आनंदोलन दरम्यान झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, शासनाकडून शासन निर्णयप्रमाणे ठरलेले रु.6000/- मानधन ते सुद्धा वेळेत व पूर्ण मिळत नाही त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या परिचालकांचे कुटूंब उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे असणारे महत्वाचे खाते माहिती व तंत्रज्ञान विभाग व ग्रामविकास खात्यामार्फत डिजिटल महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला आपले सरकार सेवा प्रकल्प यामध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या जीवावरच डिजिटल महाराष्ट्र साकार होणार असून शासन जर दिलेले शब्द पाळत नसेल तर मग हे आपले सरकार नसून हे फसवे सरकार असल्याचे घणाघात सिद्धेश्वर मुंडे यांनी करून मोर्चाला 18261 संगणक परिचालक उपस्थित असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, अपक्ष आमदार बच्चू कडू, आमदार रविकांत तुपकर, आमदार नितेश राणे, यांसह राष्ट्रवादी, शिवसेना, व अपक्ष अशा बारा आमदारांनी पहिल्याच दिवशी मोर्चाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला असल्याचे सांगितले.
आंदोलकांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट नाकारली :-
आनंदोलन दरम्यान संध्याकाळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला भेटीचे पाचारण केले मात्र आंदोलकांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट नाकारली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी याअगोदर स्पष्ट केले होते की संगणक परिचालकांचा मुद्दा माझ्याकडे नाही तर याबाबत सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील मग आता निर्णय मुख्यमंत्री महोदयांनीच घ्यावा असे आंदोलन कर्त्यांकडून सांगितले.
कंपनीकडून मंत्री व अधिकारी यांना कमिशन मिळते - आमदार शशिकांत शिंदे यांचा जाहीर आरोप
राज्यातील युवा वर्ग असलेल्या ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या संगणक परीचालकांना वेळोवेळी आंदोलन मोर्चे करावे लागतात ही फडणवीस सरकारसाठी अशोभनीय गोष्ट आहे तसेच ज्या कंपनीला आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाचे ठेकेदारी दिलेली आहे त्या कंपनीकडून सरकार मधील मंत्री व संबंधित अधिकारी यांना संगणक परीचालकांच्या मानधनातून कमिशन दिले जाते त्यामुळे ही कंपनी शासन बंद करणार नाही असा जाहीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आझाद मैदान येथील मोर्चाला जाहीर पाठींबा देताना मनोगत व्यक्त करताना केले आहे. त्याच बरोबर पोलीस बळाचा वापर करून आनंदोल दडपण्याचा प्रयत्न केला किंवा हुकूमशाही पद्धतीने एका जरी संगणक परीचालकाच्या केसाला धक्का लागला तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संगणक परीचालकांबरोबर रस्त्यावर उतरू असा इशारा देऊन संगणक परिचालक हे पद निश्चित करून आयटी महामंडळ मधे नेमणूक करावी असे सांगितले.

Post a Comment