सुवर्ण गणेश प्रकट दिन सोहळ्यास गणेशभक्तांची गर्दी



प्रतिनिधी : बोर्लीपंचतन
दिवेआगर येथील श्री आणि गणपती देव पुजेची नेमणूक ट्रस्ट विश्वस्त मंडळाने सालाबादप्रमाणे यावर्षी सोमवारी , २६ नोव्हेंबर रोजी कार्तिकी कृ . संकष्टी चतुर्थी दिवशी सुवर्ण गणेश प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला . दोन दिवस यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . भाविकांनी सोमवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच ' " गणेशाच्या दर्शनासाठी रांगा लावून गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले . प्रकट दिन सोहळ्याला दोन दिवस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आनंद घेतला . संस्थेचे अध्यक्ष महेश पिळणकर तसेच विश्वस्त मंडळाकडून कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते . श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे  निसर्गरम्य असे पर्यटनस्थळ असल्याने आलेल्या पर्यटकांनीही सुवर्ण गणेश प्रकट दिन सोहळ्याला हजेरी लावली होती . दुसर्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन मंदिरासमोरील पटांगणात करण्यात आले होते . श्री गणपती देव व पुजेची विश्वस्त नेमणूक ट्रस्ट मंडळाने प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मनोरंजनार्थ कार्यक्रमाचेही आयोजन केले होते . 


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा