बोर्ली पंचतन - (अभय पाटील)
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर किनाऱ्या लगत 10 दिवसापूर्वी अनैतिक संबंधातून खून झाल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.दिवेआगर येथे हत्या झाली असून हत्येमध्ये ठार झालेल्या इसमाचा मृतदेह झाडीमध्ये गाडून ठेवल्याची खबर प्रत्यक्षदर्शी घटना पाहिलेला दिवेआगर येथील हमीद सादुल्ला या इसमाने दिघी सागरी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांना दिली त्यानुसार घटनास्थळी जाऊन मृतदेह गाडलेल्या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार डोक्यामध्ये जोरदार मार बसल्याने हा 50 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून सदर प्रकार अनैतिक संबंधातून झाले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दिवेआगर येथे झालेल्या या हत्येमुळे परिसर हादरले आहे. प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यानी दिली पोलिसांना 10 दिवसा नंतर माहिती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेळास खाडी किनाऱ्या लगत समुद्र किनारी मागील 10 दिवसापूर्वी एका अज्ञात इसमाचा खून करून मृतदेह समुद्र किनारी झाडीमध्ये गाडला असल्याची माहिती घटना पाहणारा दिवेआगर येथील वास्तव्यास असणारा हमीद सादुल्ला वय अंदाजे 50 वर्षे याने पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी यावर तत्काळ घटनास्थळी जावून
पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, नायब तहसीलदार बी जी निगुडकर तसेच पोलीस कर्मचारी यांनी प्रेत उकरून काढले सदर प्रेत कुजलेल्या स्थितीत असून प्रेताची ओळख अजूनही पटली नसली तरी प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्याच्या सांगण्यानुसार हत्येच्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या संशयित दिवेआगर येथील 1 खरसई म्हसळा येथील 1 युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटना स्थळावरून हत्येमध्ये वापरण्यात आलेला रक्त लागलेला फावडा व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचा कसून तपास घेत असून आम्ही या हत्येचा लवकरच तपास पूर्ण करून मूळ आरोपीसह सर्व आरोपी जेरबंद करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी 2 जण ताब्यात घेतले आहेत.
दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये कॉ र नं 34/2018 भादवी कलम 302, 201 अंवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment