प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
भजन म्हणजे भक्ती. या भक्तीत एकरूप होण्यासाठी टाळ-मृदंगाच्या साथीने रंगून जाणं, ही कोकणची खासियत. गणेशोत्स नवरात्री मध्ये तर या भजनांना अधिकच रंग चढतो. गणेशोत्सवाच्या रात्री भजनाच्या साथीने सजतात, जागविल्या जातात. महिनाभर आधीच नवी गाणी, नवी बारी बसवण्यासाठी भजन मंडळांची तयारी सुरू होते. तबला, मृदंग सजवणार्या कारागिरांची लगबगही वाढते. कोकणात प्रत्येक गावागावात, वाडीवर भजनी मंडळं असतात.
मध्यंतरीच्या काळात काहीशी मागे पडलेली भजन कला आता वाढत्या स्पर्धांमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. आज कार्तिकी एकादशी निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत कोकणातील सुप्रसिद्ध भजनीबुवा श्री अरविंद कानू नाक्ती यांच्याबद्दल. बारावी पर्यंतच शिक्षण रायगड मधील म्हसळा तालुक्यात झालं आणि शिक्षणानंतर नोकरीसाठी मुंबई गाठली. शिक्षण पूर्ण करून नोकरीत स्थिर झाले. नोकरदार ते यशस्वी नावाजलेले भजनीबुवा असा त्यांचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत...
नोकरदार ते यशस्वी नावाजलेले भजनीबुवा कसा होता हा प्रवास
खरंतर घरामध्ये भजनाचा वारसा होताच.२००३ मध्ये भजनाच्या एका कार्यक्रमात जाण्याचा योग आला होता. तो कार्यक्रम पाहून मला सुद्धा भजनीबुवा व्हावं असं वाटत होतं. आणि गुरुवर्य दीपक वसंत चव्हाण यांच्याच कार्यक्रमातुन भजनाची आवड झाली आणि त्याबद्दल शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा झाली. आणि २५ वर्षांपूर्वी बंद झालेली घरच भजनाचं
मंडळ पुन्हा सुरू झालं.
आपले गुरुवर्य आणि सहकाऱ्यां बद्दल काय सांगाल...
कै. चंद्रकांत परब, काशीराम परब घराणाच्या संस्कृतीक वारसा सांगणारे गुरुवर्य दीपक वसंत चव्हाण यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. भजनीबुवा म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर दीपक वसंत चव्हाण यांच्या तालमीत यायला हवं. तसेच सुप्रसिद्ध मृदुनगमनी राकेश मेस्त्री यांनी विशेष सहकार्य केले आणि नावारूपास आणले. कोलाडचे निळेकर बुवा, घोसाळकर गुरुजी, पूनम आगरकर ही कला जिवंत ठेवणारी माणस. नव्या दमाची गायकी असलेला बुवा उदय नाक्ती ही उत्तमच...
कोणकातील पारंपरिक भजनपद्धती बदलत चालीय का..?
नाही, मला असं वाटत नाही, परंपरा आणि मार्मिक भजनपद्धती कोंकणात विशेषतः आपल्या रायगड मध्ये आजही जिवंत आहे. पण डबल बारी करताना बोलण्याच तारतम्य पाळाव, व्यक्तिगत पातळीवर टीका करू नये. विरुद्ध बुवा बेसूर असेल तरी त्याच्या वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये, कसही असला तरी भक्ती आहे हरिनामाची निंदा होता कामा नये.
आयुष्यातील आनंदाचा क्षण कोणता...?
प्रसिद्धी नसतानाही भाजनांच्या बाऱ्या मिळत गेल्या आणि माझ्याही नकळत त्या बंद पाकिटाच वजन वाढत होत. आई सोमजाई च्या आशीर्वादाने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने जिथं जाईन तिथं यश मिळत गेलं. मोठ्या बंधूंच्या पाठिंब्यामुळे आजवर ही मजल मारता आली.
श्रीसोमजाईमाता प्रासादिक भजन मंडळ आगरवडा (मुंबई)
गुरुवर्य - श्री दीपक वसंत चव्हाण
बुवा - श्री श्री अरविंद कानू नाक्ती
संपर्क - +91 93 22 252574


Post a Comment