( म्हसळा प्रतिनिधी )
म्हसळा तालुक्यातील अनुसूचित जाती , नवबौध्द व चर्मकार समाजासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत, साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत, संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादीत या मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तालुक्यातील संबंधीत वर्गापर्यंत पोहचविण्यासठी मेळाव्याचे आयोजन पंचायत समीतीच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले होते . पं.स. च्या सभापती छाया म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपसभापती संदीप चाचले . महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ एस.एस्.बनसोडे, साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत चे अे.एल. कांबळे, आर.एस् सावंत , पंचायत समितीचे ग्रां. विस्तार अधिकारी गजानन दिधीकर, खरसईचे सी.एम्. फेलो अमोल पाटील, संदेरीचे सी.एम्. फेलो नामदेव गायकवाड, श्रीमती अमृता वडे, पी.व्ही.मोरे, माळी, विचारे, ग्रामसेवक एम.एस. जाधव मंडळी उपस्थित होती.
यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत या मंडळाची स्थापना ४० वर्षापूर्वी झाली असल्याचे सांगून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे अंर्तगत कार्यरत आहे . मंडळातर्फ ५० % अनुदानातून योजना , प्रशिक्षण, बीज भांडवल योजना राबविल्या जात आसल्याची माहीती दिली. साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत या मंडळातर्के मातंग व तत्सम समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नती साठी विविध योजनांची माहीती देण्यात आली .संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादीत या मंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येऊन चर्मकार समाज अर्थीक दृष्टया सबळ व सामाजिक समानता प्राप्त करून दिली जाते असे सांगितले गेले.

Post a Comment