सहकाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती अभिमानस्पद ...अदिती तटकरे



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
  समाजाचा उत्कर्ष सहकाराच्या माध्यमातून अभिप्रेत आहे . समाजातील प्रत्येक घटकास सामावून घेण्याची क्षमता सहकार चळवळीत आहे . कोकणाच्या विकासासाठी सहकार चळवळ महत्वाची  आहे .अन्य प्रांतांच्या तुलनेत आपणां कडे सहकार चळवळीला अद्याप वेग प्राप्त झालेला नाही .सहकार चळवळीत   सर्व सामान्य व्यक्तीचे स्थान  महत्वाचे आहे असे प्रतिपादन अदिती तटकरे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी सोमजाई पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी केले.
   सोमजाई पतसंस्थेने सामाजिकतेचे भान ठेवून केलेले कार्य कौतुकस्पद आहे .नगरपालिका शाळा ,सोमजाई देवस्थान ,वाचनालयातील  विविध स्पर्धा यांना वेळोवेळी मदत करून  पतसंस्थेने आदर्शवत काम केले आहे.सन1993 मध्ये रुपये 20 हजार भागभांडवला वरून सुरू झालेली पतसंस्था आज करोडो रुपयांची उलाढाल करत आहे हे सहकार चळवळीचे खरे यश आहे.सहकारा मुळे सर्वसामान्य लोकांना रोजगार निर्मिती होते त्याच बरोबर समाजाचा सर्वांगीण विकास साधला जातो .असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
सहकार चळवळीस गती प्राप्त झाल्यास शेतीस पुरक विविध उद्योगास चालना मिळेल .सहकार म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीने आपल्या क्रयशक्ती द्वारे साधलेला विकास होय .सहकार तत्वामुळे सोमजाई पतसंस्थेने विकास साधला आहे .जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे काम पतसंस्थेने केले आहे. असे उपस्थितांना संबोधित करतांना अदिती तटकरे यांनी सांगितले. पतसंस्थेकडून विविध सोई सवलतीची घोषणा सदरच्या प्रसंगी करण्यात आली. तसेच सोमजाई पतसंस्थेच्या आज पर्यंत च्या वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या   चलचित्राचे प्रदर्शन करण्यात आले. सोमजाई पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव प्रसंगी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने ,पर्यटन सभापती वसंत यादव ,नगरसेवक दर्शन विचारे ,  सुबोध पाब्रेकर  , सुनील ठाकूर ,सर्व संचालक मंडळ ,कर्मचारी व सभासद उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा