माणगाव - दिघी काम टप्प्याटप्प्याने करा : अन्यथा आंदोलन छेडणार ; राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सुचिन किर यांचा इशारा



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह 
दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्पात समावेश असलेल्या दिघी पोर्टला जोडणारा माणगाव - दिघी हा मार्ग खड्ड्यांचा बनला आहे . त्यामुळे विकासाच्या नावे होणाऱ्या चालढकलबाबत संताप व्यक्त होत आहे माणगाव ते दिघीदरम्यान अनेक ठिकाणी | रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून त्याचा त्रास वाहतुकीला होत आहे. माणगाव ते दिघी दरम्यानच्या रस्त्याचे काम माणगाव पासून मोरबे , डोंगरोली , साई घोणसे घाट , म्हसळा , सकलप , मेंदडी अशा ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे . रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने रस्त्यावर वाहतुकीला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चालक सांगतात . माणगाव ते दिघीपर्यंतच्या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे , सर्वच काम एकाच वेळी हातात न घेता एक काम पहिले पूर्ण करून दुसरे काम हातात घ्यावे ; अन्यथा आक्रमक पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष सुचिन किर यांनी दिला आहे . माणगाव पासून म्हसळा बायपास ते दिघी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य दिसते . माणगाव , मोरबा, साई म्हसळा , मेंदडी , वडवली तसेच वेळास येथून प्रवास करताना वाहक व प्रवाशांना जीव सांभाळून प्रवास करावा लागतो .

मेंदडी ग्रामस्थांचा विरोध....
म्हसळा येथील संपादन अधिकारी यांनी रस्ता सुंदीकरणासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची बैठक मे महिन्यात आयोजित केली होती . मात्र अशी कोणतीही बैठक न होता थेट रस्ता सुंदीकरणास सुरुवात केल्याने संताप व्यक्त केला जात आहे जागेचा संपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय कामाला हात लावू देणार नसल्याचे मेंदडी येथील शेतकच्यांनी सांगितले . रस्त्याच्या कामाचे अद्यापही पूर्ण अधिग्रहण झाले नसूनदेखील रस्त्याचे काम सुरू केल्याने जमीन मालक आक्रमक झाले आहेत .

पुणे - दिघी महामार्ग क्रमांक 753F
पुणे - मुळशी - माणगाव - दिघी हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग बनला आहे , महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ ( MSRDC ) च्या माध्यमातून सध्या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा