पक्षानी दिलेली जबाबदारी व तालुक्याचा विकास करण्यासाठी पदाचा वापर पारदर्शकपणे करीन : शैलेश पटेल


समन्वय समीतीचे अध्यक्ष पटेल यांचा सत्कार करताना तहसीलदार रामदास झळके व मान्यवर


संजय खांबेटे  म्हसळा प्रतिनिधी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यानी दिलेल्या जबाबदारीचे परीपूर्ण पालन करीन व राज्य शासनाच्या धोरणानुसार तालुक्यातील ग्रामिण भागाचा विकास पारदर्शकपणे करीन असे मत म्हसळा तालुका समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष शैलेश पटेल यानी मांडले. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यानी समन्वय समिती अध्यक्ष शैलेश पटेल व समिती सदस्य यांचा परीचय व सत्कार कार्यक्रमाला सदस्य तुकाराम पाटील, श्रीमती धनश्री मुंडे, सरोज म्हशीलकर , मिना टिंगरे, नंदकुमार सावंत, मंगेश म्हशीलकर, महेश  पाटील , नायब तहसीलदार के.टी. भिंगारे,अे. पी.आय. प्रविण कोल्हे . ग.वि.अ. वाय.एम्. प्रभे, जि.प.बांधकाम विभागाचे उप- अभियंता आर्.एच्. काकुळसे  , प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे, कृषी विभागाचे सुजय कुसाळकर,नगर पंचायतीचे सुधीर म्हात्रे, अशोक सुतार, वन विभागाचे रामकृष्ण कोसबे, सपोनी शहबाज शेख , TLR चे महेंद्र मोहीते , शिक्षण विभागाचे सलाम कौचाली,निकेश कोकचा  उपस्थित होते. या महीन्याच्या अखेर पर्यंत समन्वय समीतीची सभा लावावी , केंद्र व राज्य शासनाच्या सर्व खाते प्रमुखाना योग्य मुदतीत आमंत्रण द्यावे आशा सूचना यावेळी पटेल यानी दिल्या. समन्वय समीतीचे सदस्य तुकाराम पाटील , महेश पाटील यानी यावेळी मनोगत व्यक्त केले.


केंद्र व राज्य शासनाची ध्येय धोरणाचे 'राबविण्याचे पहिले परीणाम प्रथमतः शहरांत उमटतात त्यामुळे समन्वय समीतीने म्हसळा नगरपंचायत व. विविध हेड अंर्तगत होणारी कामे ( उदा. आरोग्य, स्वच्छता ) याबाबत आढावा घेणे जरुरीचे आसल्याची मागणी केली. अनेक महत्वाच्या मीटींगना ते हेतुपुरस्कार गैर हजर असतात असेही यावेळी चर्चेला आले.

                सत्कार समारंभात मनोगत व्यक्त करताना पटेल.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा