श्रीवर्धन ( विजय गिरी )
जन्माने सुनिल तटकरे गवळी असला तरी कर्माने कुणबी आहे. कै.ग.स.कातकर साहेबांचे स्मारक तालुका स्तरावर उभे रहावे ही माझी ईच्छा व ते पुर्ण करण्याचे माझे कर्तव्य आहे. असे वक्तव्य श्रीवर्धन तालुक्यातील जसचली येथे आयोजीत केलेल्या कुणबी समाज बांधवांच्या राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रमात राष्ट्र्वादी काॅंगे्रस पक्षाचे सरचिटणीस माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी केले.या वेळी व्यासपीठावर तालुकाअध्यक्ष दर्शन विचारे, नगराध्यक्ष नरंेंद भुसाणे, उपनगराध्यक्ष जितेंद्र सातनाक,तालुका उपाध्यक्ष अमित खोत, सुचिन किर,युवक तालकस अध्यक्ष सिध्दार्थ कोसबे,अविनाश कोळंबेकर,जि.प.सदस्या प्रगती अदावडे,पं.स.सदस्य मंगेश कोमनाक,जसवली सरपंच सबा फिरफीरे,मोतीराम परबळकर लाला जोशी मंदार तोडणकर आदी मान्यवर उपस्थीत होते.पुढे बोलताना तटकरे साहेब म्हणाले की,ग.स.कातकर साहेबांना 1970 साली जवळुन पाहण्याची प्रथम संधी मिळाली माझे वडील आणी कातकर साहेबांचे जिव्हाळयाचे संबध होते.कातकर साहेबांची कारकीर्द जवळुन पाहण्याचे भाग्य मला लाभले,कातकर साहेबांनी या जिल्ह्याला प्रदिर्घ सेवा दिली.बहुजन समाजाचे नेतृत्व कसे असावे हे कातकर साहेंबाकडुन शिकायला मिळाले.श्रीवर्धनचा विकास हा मी केलेला नसुन कातकर साहेबांच्या विचारातुन झालेला विकास आहे.काल कातकर साहेबंावर पुस्तक प्रकाशित झाले या प्रकाशन कार्यक्रमाला काही कारणास्तव मला उपस्थीत राहता आले नाही या बाबत आपण दिलगीरी व्यक्त करतो. कातकर साहेबांचे स्मारक व्हावे ही माझी ईच्छा असल्याने त्या बाबत लवकरच आराखडा तयार करुन या स्मारकाचा बहुजनांना उपयोग होईल हे प्रयत्न असतील असे जाहीर केले. कातकर साहेबांनी कधीही भुमीका बदलली नाही. भक्कम विचाराच्या पयावर ठामपणे उभे राहीले.ते कधीही डगमगले नाहीत. या गावातील अपुर्णवस्थेत राहीलेल्या समाजभवनासाठी आम. अनितेत तटकरे यांच्या आमदार निधीतुन दहा लाख रुपये निधी दिल्याचे जाहीर केले.10 वर्षात श्रीवर्धनचा कायापालट केला याचा अभिमान असुन केलेला विकास हा पहीला टप्पाच आहे अजुन विकास करायचा असल्याचे सांगितले.केलेली विकास कामे सांगायची झाली तर 24 तास पण कमी पडतील असा टोला केंदीय मंत्री खासदार गीतेंना लगावला.मी सत्तेत नाही साधा आमदार देखील नाही तरी सुध्दा विकास कामे मी मागी लावु शकतो हा विश्वास जिल्ह्यातील जनतला व ग.स.कातगर साहेबांच्या मुलाला असल्याने आज देखील कामांच्या निवेदनाची संख्या वाढत आहे. आपल्यावरील विश्वासामुळेच असंख्य कूणबी बांधवानी राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.मी काम करु शकतो म्हणुनच मला बोलावले जाते. जनतेचा आपल्यावरील विश्वास हीच आपल्या प्रामाणीकपणे केलेल्या विकास कामांची पोच पावती असल्याचे सांगितले. पर्यटनावरील असलेली अर्थ व्यवस्था निर्माण करु शकलो याचा सार्थ अभिमान बसुन रोजगाराची साधने निर्माण करण्याची आपली ईच्छा असल्याचे सांगितले.ईच्छाशक्ती व मन शुध्द असले की विकास कामे करता येतात दाभिकपणे भाषणे करुन काही उपयोग होत नाही असा टोला विरोधकांना लगावला.आजही श्रीवर्धन तालुक्यात कुठेही आपल्या डोळ्यावर पट्टी बांधुन तालुक्यातील कुठल्याही वाडी वस्तीवर जायला सांगा आपण नक्की जावु कारण तालुक्यातील प्रत्याक वाडी वस्त्यांवरी मी गेलेलो बाहे तेथील समस्या सोडावल्या आहेत व लोकाशी माझी जुळली असल्याचे सांगितले. पक्षप्रवेश कार्यक्रमापुर्वी सुनिल तटकरे सांहेबांना ग्रामस्थानी महीलांनी लेझीम खेळत पुष्पवृष्टी करत कार्यक्रम स्थळावर आणुन जोरदार स्वागत केले.कार्यक्रम स्थळी आल्यानंतर तटकरे साहेबांनी कै.ग.स.कातकर साहेबांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुप अभिवादन केले.विठठ्ल रखुमाईचे दर्शन घेवुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.प्रवेश कार्यक्रमात जसवली गावातील संपुर्ण स्थानिक व मुबंई कुणबी बांधवानी राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या वेळी आदगाव येथील कुणबी समाजाने देखील जाहीर प्रवेश केला प्रवेश कत्र्यांचे स्वागत करुन त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे अश्वासन तटकरे साहंबानी दिले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक दशरथ कातकरसर यांनी केले तर सुत्र संचालन टाकळे यांनी केले.


Post a Comment