संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
श्रीवर्धन विधान सभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य वाढत आसल्याने मित्रपक्षांची राजकीय स्थीती वाईट होत असल्याची जाणीव मित्रपक्षांपैकी कॉंग्रेसला प्रथम झाली त्यानी शिवसेनेजवळ सोयरीक करुन आंबेतला कॉंग्रेसचा सरपंच केला व तोच पॅटर्न मतदार संघात लावण्याचा निर्णय घेतला. अशाच पद्धतीच्या निर्णयापर्यत शेकापक्ष आल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी R.D. C. बँकेत झालेल्या तालुका चिटणीस मंडळाचे सभेत उमटले. यावेळी तालुका चिटणीस संतोष पाटील,जेष्ठ नेते परशुराम मांदाडकर,आर डी सी बँक माजी संचालक श्रीपत धोकटे,आर डी सी बँक संचालक तुकाराम महाडीक,जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक गिजे,राजाराम धुमाळ,युवक अध्यक्ष निलेश मांदाडकर,गोंडघर सरपंच स्वप्नील बिराडी,महिला आघाडी अध्यक्षा सुलोचना लोणशीकर,संतोष धुमाळ,एकनाथ खामगावकर,हेमंत पयेर जितेंद्र गिजे, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील व म्हसळा तालुका संपर्क चिटणीस आमदार पंडितशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणार्या ग्रामपंचायत ,लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचे बूथ पातळीवर नियोजन करण्यात आले असून तालुका चिटणीस मंडळ,तालुका युवक संघटना,विद्यार्थी संघटना, पक्षांतर्गत विविध सेलसह जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य व जिल्हास्तरिय अन्य पक्ष संघटनेत तालुक्यातील पदाधिकार्यांची निवड करण्यात आली . नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पक्षाच्या आगामी कार्यकर्ता मेळाव्यात निवड पत्र देण्यात येणार असल्याचे संतोष पाटील यांनी संगितले . गाव पातळीवरील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी निर्णय घेण्यात यावेत तसेच वरिष्ठ पातळीवर होणार्या युत्या व आघाड्यांमुळे तालुक्यात पक्षाची पिछेहाट होत आहे. आघाडीतील मित्र पक्ष सातत्याने सापत्न्य वागणूक देत आहेत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमांतून होणाऱ्या शासकीय कार्यक्रमातून शेका पक्षाला हेतूपुरस्कर डावळले जाते असे अभ्यासू मुद्दे युवा कार्यकत्यांकडून पुढे आले. येणार्या निवडणुकांमध्ये तालुक्यात वेगळी भूमिका मांडण्याची गरज अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
तालुक्यात पूर्वी राजकारणांत शेका पक्षाचे प्राबल्य होते. अनेक वर्ष शिवसेने सोबत मित्रपक्ष म्हणून काम करताना जिल्हा परिषद व पंचायत समितीत शेकापसाला स्थान होते, ग्रामपंचायत पातळीवर किमान १५ ग्रामपंचायतीवर शेका पक्षाचा सरपंच असे . आता मात्र परिस्थीती उलटी आहे. आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेत शेका पक्षाला प्रतिमिधीत्व मिळविण्यासाठी आपले अस्तीत्व तयार करणे आवश्यक आसल्याचे आभ्यासू मत युवा केडर मधुन मांडण्यात आले.

Post a Comment