बोर्लीपंचतन : प्रतिनिधी
गावामध्ये सर्वधर्मीयांनी एकत्र बसून दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घ्यावा व यातून शांतता व सर्वधर्म समभाव जोपासला जावा हाच कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन बोर्लीपंचतनचे सरपंच गणेश पाटील यांनी केले . बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते . दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन येथील मोहनलाल सोनी विद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते . यावेळी सरपंच गणेश पाटील , उपसरपंच मंदार तोडणकर , तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत तोडणकर , श्रीवर्धन सभापती मीना कुमार गाणेकर , जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर , राष्ट्रवादी नेते महमद मेमन , शिवसेना उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके , जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कुळकर्णी , डॉ निलकंठ जोशी , डॉ वसुधा जोशी , डॉ . सुजाता बापट , माजी सरपंच फारूक दामाद , माजी उपसरपंच लीलाधर खोत , सुषमा दिवेकर शेकाप अल्पसंख्यांक चिटणीस अन्सार चोगले , ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील , शब्बीर उंडे , मन्सूर गिरे , सायली गाणेकर , आदिती पाटील , प्रियांका मुरकर , भंडारी समाज अध्यक्ष शशिकांत परकर , आगरी समाज अध्यक्ष रमेश कांबळे , राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा ज्योती परकर , प्रदीप खोपकर , वसुधा खोत , पद्मिनी खोपकर , श्रीकांत तोडणकर , सुजित पाटील , संतोष गायकर , शंकर गाणेकर , श्रीराम तोडणकर तसेच इतरही ग्रामस्थ बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी उपसरपंच मंदार तोडणकर म्हणाले की , गतवर्षी घोषणा झाल्याप्रमाणे येत असलेली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीयांनी प्रयत्न करून जिल्ह्यास आदर्श द्यावा . तर महमद मेमन म्हणाले की , दिवाळी राष्ट्रीय सण असून एकमेकांबद्दलचे क्लेष साफ करुन आनंदाने नांदावे व गरिबांना देखील दिवाळीचा सण साजरा करता यावा यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा , असे आवाहन केले . उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी सर्वांचे मनोमिलन होईल व ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी निश्चित सकारात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा व्यक्त केली तर दिवाळीच्या सणाच्या फराळानिमित्त एकत्र येऊन आपण स्नेह जपुया , असे आवाहन केले .

Post a Comment