म्हसळा येथील दोन घरफोडयांचे आरोपी  जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केले जेरबंद : ६ जणांच्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

आरोपी     असमा अ. सत्तार पंडे यांचे  नवेनगर येथील घर  गुन्हा अन्वेषण व स्थानिक पोलीसाना दाखवत असताना.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
    म्हसळा शहरातील काही दिवसाच्या अंतराने झालेल्या दोन घरफोडयांतून संदर्भ लावत म्हसळा पोलीसानी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा कडे वर्ग केलेल्या गुन्हयातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो .नि.जे.ए. शेख, सपोनि दिलीप पवार, सचिन सस्ते आणि पोउनि अमोल वळसंग यानी पो. अधिक्षक अनिल पारस्कर, अप्पर पो. अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथके निर्माण करून रायगड, ठाणे ग्रामिण व कोल्हापूर विभागातील २० गुन्ह्यांची उकल करून ६ जणांची टोळी ताब्यात घेतली. यामध्ये जिल्ह्यातील माणगाव, पेण, रसायनी, रोहा, कोलाड , दादर सागरी व म्हसळा या ७ पो.स्टेशन अंर्तगत व ठाणे  ग्रामिण, कोल्हापूर विभागातील  २० गुन्हांच्या तपास व मुद्देमाल ताब्यात घेण्यात रायगड गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले.
    म्हसळा शहरातील गु. र.नं. ४६ / २०१७, ३३/२०१८ फिर्यादी असमा अ. सत्तार पंडे रा. नवेनगर व गु. र.नं.३ ७ /२०१८ फिर्यादी  बिलाल इमाम शेख रा. इदगाह, या तीनही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत झाला आसल्याचे म्हसळ्याचे सपोनी प्रविण कोल्हे यानी सांगितले. असमा यांच्या एटीएम कार्डचा वापर आरोपीने मुंबई- कोकण- गोवा रस्त्यावरील संगमेश्वर येथील हॉटेल सनराईज येथील बँक ऑफ इंडियाचे ATM मधून काढलेली रक्कम व याचे cctv फूटेज व अन्य गोष्टींच्या आधारे म्हसळा पोलीसानी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला माहीती दिली होती त्याची गुन्हे अन्वेषण विभागाने खातरजमा करून  प्रथम मौहमद अली हुसेन शेख वय २४ रा. सावर्डे, ता. चिपळूण याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले, त्याला विश्वासात घेऊन तपास केला असता त्याचे अन्य साथीदार १ ) ईश्वर रमेश अडसुळे वय ३३ रा. शिरढोण , ता शिरोळ, जि. कोल्हापूर. २) राकेश राजेंद्र  चांदीवडे , वय ३१रा. पाटील व्हिला, सेक्टर १९ कोपर खैरणे,नवी मुंबई ३ ) सनी छोटू जैसवाल, रा. सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, ४) प्रविण विष्णू कांदे, वय २७ रा. भक्ती कँप देवश्रृष्टी अपार्टमेंट, निर्माण नगर , निले मोरे, नालासोपारा वेस्ट जि. ठाणे( मूळ रहाणार इन्सुली, पो. बांदा, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) ५) शरद नारायण घावे. वय २४ रा. गोखीवरे गाव शंकर मंदीरा जवळ वसई इस्ट .अशा अन्य ५ आरोपीना ताब्यात घेतले आहे. अटक असणाऱ्या आरोपींचे विरुद्ध भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ४११, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल आहेत अन्य काही दुकानदारांचा तपास सुरु आसल्याबाबत सांगण्यात आले.

आरोपींकडून  ताब्यात घेतलेला ऐवज
१ )३१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ऐवज 
२) ३६ मोबाईल फोन, 
३ )४ लॅप टॉप, 
४ ) ३ LED Tv, 
५ ) एक चार चाकी वाहन 
६) एक मोटर सायकल असा मुद्देमाल हस्तगत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा