हा खेळ ऊन सावल्यांचा... वातावरणातील सततच्या बदलांमुळे नागरीक हैराण : आंबा बागायतदारही चिंताग्रस्त.



संजय खाबेटे : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यात गेले तीन दिवस ढगाळ वातावरण व उन्हाच्या तडाख्याने नागरीक प्रचंड हैराण झाले आहेत .ऐन दिवाळी सीझन मध्ये कडक उन्हामुळे  दुपारी २ ते ४ या कालावधीत गीऱ्हाईकांचा शुक -शुकाट असतो . म्हसळा शहरांत व तालुक्यांत किमान तपमान २७अंश सेल्सीअस तर कमाल ३६ अंश सेल्सीअस, हवेतील  आद्रता ४९ % आहे. येत्या २-४ दिवसांत तपमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुपारी १२ .३० ते दुपारी ३ पर्यंत वातावरणात शुष्कता वाढते , त्वचा कोरडी झाल्या प्रमाणे, डोळयाची आग, सतत तहान लागणे असे होऊ लागले आहे.



आंबा बागायतींतून कोवळया पानांचा फुटवा झालेला आहे, अशा परीस्थीतीत हवेतील तपमान वाढल्यामुळे  प्रथम करपा व नंतर शेंडे आळीचा प्रादुभाव होऊ शकतो .
-अ.शकूर हुर्जुक, आंबा बागायतदार.

  काही भागात पडलेला हलका पाऊस व दमट हवामानामुळे आंबा कलमांच्या नवीन पालवीवर करपा रोगाची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी १% बोर्डोमिश्रण प्रती १०ली. पाण्यात मिसळून फवारावे.
-सुजल कुसाळकर , कृषी पर्यवेक्षक , म्हसळा

सध्या ढगाळ वातावरण असल्याने हवामानात बदल झाला आहे. काही दिवस असेच वातावरण राहिल्यास आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावर विकली जाणारी थंड पेये, बर्फ आणि आरोग्यास अपायकारक ठरणारे पदार्थ सेवन करणे टाळावे. तसेच नियमित घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवावी.
-डॉ. महेश मेहता, म्हसळा


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा