श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील वीज ग्राहकांना प्रत्यक्षातील रिडींगपेक्षा अधिक बिल देण्यात येत आहेत . वाढीव रिडींग तसेच बील भरण्याची मुदत संपून गेल्यावर ते हातात मिळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे महावितरणच्या या सावळागोंधळामुळे ग्राहकांत संताप आहे ग्रामस्थांना भरमसाठ वीज देयक येत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहे . रिडींग घेणारे कर्मचारी हे अप्रशिक्षीत असल्यामुळे मीटरमधील कोणता आकडा रिडींगचा आहे हेसुद्धा त्यांना कळेनासे झाले आहे योग्य माहिती नसल्यामुळे ते कर्मचारी जो आकडा दिसेल , त्याचे छायाचित्र काढून त्याप्रमाणे देयक तयार करीत आहेत . वीज वितरण त्यावरूनच कंपनी आकारणी ग्राहकांच्या करून माथी तेंच देयक थोपवित आहे. वाढीव देयकामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन आहे . वीज देयक दुरुस्ती करण्याकरिता ग्राहक महावितरण गेले असता तेथील कर्मचारी | त्यांना सहकार्य करीत नसल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे . महावितरणने नियुक्त केलल्या एजन्सीच्यावतीने वीज बिल उशिरा दिले जात आहे . मुदत संपण्यास एक किंवा दोन दिवस बिल असल्यामुळे नगरिकांची असताना मिळत धावपळ उडू लागली नागरिकांना वीज बिल आहे . वेळेत मिळावे यासाठी महावितरणने बिल देण्याचे काम खाजगी दिले आहे एजन्सीला महावितरणचे बोर्लीपंचतन येथील कनिष्ठ अभियंता व श्रीवर्धन येथील सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयाचे अंतर १७ किलोमीटरचे आहे . बोर्लीपंचतन कनिष्ठ अभियंता कार्यालयात बहुतांश वेळा दिसतच नाही . देयक कमी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अनेकदा येरझारा माराव्या लागतात
किमान आठ दिवस अगोदर बील ग्राहकांच्या हातात हवे...
गावात घरातील माणसे मोलमजुरीसाठी घराबाहेर जात असल्याने कामाच्या व्यापात बिलभरण्यास वेळ लागतो . दोन दिवसात ते भरले नाही तर डीपीसी भरावा लागत आहे . शिवाय पुढील वेळेला थकबाकीत नाव तर येणार नाहीना अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे महावितरण आता बिल थकले की लगेच वीजपुरवठा खंडित करते . हा नेहमीचाच प्रकार असून रिडींग घेणार्या कर्मचाऱ्यांवर कोणतेही निबंध अद्याप लावण्यात आले नाही .
ऑनलाईन वीज बिल भरा...
महावितरण च्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर जाऊन 'कन्झुमर सव्हिंसेस ’ या भागात जाऊन पे बिल ’ पर्यायावर क्लिक ’ करून वीज देयकावर नमूद असलेला १० अंकी ग्राहक क्रमांक व ४ अंकी बिलिंग युनिट क्रमांक टाकून ऑनलाईन पद्धतीने ग्राहक वीज बिलाच शकतात . क्रेडीट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून बिलाचा भरणा करण्याची सुविधा आहे
वीज बिल देताना सही घ्यावी..
बिले हातात टेकवणार्या खाजगी संस्थेने रजिस्टर वर सही करून पोच घ्यावी जेणेकरून ग्राहकांना कधी बिले हातात मिळतात हे लक्षात येईल अशी मागणी वीजग्राहक प्रितेश परमार यांनी केली आहे .

Post a Comment