सुधीर नाझरे, मुरुड
घरगती गॅस सिलेंडरच्या स्फोटाने शक्रवारी ( दि . ३0 ) मुरुड शहर हादरले . या घटनेमध्ये सहाजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे . त्याला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा शासकीय कळणालयात हलविण्यात आले आहे . तर पाचजणांवर मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत . मुरुड शहरातील गणेश आळीमध्ये अजित प्रभाकर जोशी यांचे कुटुंब राहते . शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या समारास जोशी यांच्या स्वयपाकघरातील घरगुती गैस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला . त्यामुळे परिसरात प्रचंड हादरा बसला . अगदी १ हजार मीटरवरील परिसरात या स्फोटाचे हादरे बसले . त्यामुळे मुरुडकरांमध्ये घबराट पसरली होती . सिलेंडरचा स्फोट होऊन जोशी यांच्या घराला आग लागली . ही घटना घडली तेव्हा घरात अजित जोशी , त्यांची पत्नी आणि मुले होती . हे चौघेही या घटनेमध्ये जखमी झाले असून त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत . तर स्फोटाच्या हादब्याने परिसरातील लाकडे आणि इतर वस्तू वर उडाल्या . त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे दोघेजणही जखमी झाले आहेत . ते यावेळी घराच्या दिशेने येत होते . दरम्यान , घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तसेच मुरुड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक परिश्रमाने ही आग विझविण्यात यश मिळवले . त्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यानंतर सहाही जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या हाता , पायाला , डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत . यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले दरम्यान , रात्री उशीरा घडलेल्या या घटनेने मुरुडमध्ये घबराट पसरली होती . हादरा इतका जबरदस्त होता की नेमके काय घडले ? हेच काही वेळ कळाले नाही . घटनास्थळावर तसेच रुग्णालयात परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती . मात्र सिलेंडरचा स्फोट कशामुळे झाला ? याबाबतचा तपास मुरुड पोलीस करीत आहेत .

Post a Comment