म्हसळा-वार्ताहर
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर आदरयुक्त चर्चा करून संविधान दिवसाचे महत्व विषद व्हावे या उद्देशाने म्हसळा तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांचे जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. संपुर्ण देश भरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेशानुसार वरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या अनुषंगाने रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण,जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,श्रीवर्धन विधान सभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक,अनुसुचितजाती मोर्चा अध्यक्ष प्रकाश बिनेदार यांचे मार्गदर्शना नुसार म्हसळा तालुक्यात भाजप मार्फत भारताचे संविधान(प्रस्तावना)यांचे अनुसुचित जाती मोर्चाचे अध्यक्ष ऍड कल्पेश शिर्के यांनी सामुहिक वाचन केले.सुरवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्रतिमेस आणि घटना ग्रंथास जिल्हा चिटणीस सरोज म्हशीलकर व तालुका चिटणीस प्रकाश रायकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.संविधान गौरव व सन्मान कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारणी सदस्य मंगेश म्हशीलकर,तालुका चिटणीस तुकाराम पाटील,महिला मोर्चा तालुका अध्यक्षा मिना टिंगरे,शहर अध्यक्ष मंगेश मुंडे,युवा तालुका अध्यक्ष शरद चव्हाण, आरपीआय अध्यक्ष राजेश तांबे,किसान मोर्चा अध्यक्ष सुनिल शिंदे,अनिल टिंगरे,उपाध्यक्ष भालचंद्र करडे,घनश्याम जाधव,विश्वनाथ कदम,मनोहर जाधव,रामजी टिंगरे,रावजी घाणेकर,लहू तुरे,समीर धनसे,आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment