जनतेचे प्रेम माझी खरी संपत्ती ....सुनील तटकरे




श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला रोजगाराची संधी निर्माण होईल असा पर्यटनाचा विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे .विकास माझी जात व माणुसकी माझा धर्म आहे .असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी  केले .
श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस ने आयोजित जीवना कोळीवाडा येथे आयोजित कार्यक्रमात तटकरे  बोलत होते .जनतेशी बांधिलकी ठेवत सत्ता नसताना अनेक विकास कामे श्रीवर्धन तालुक्यात केली आहेत .श्रीवर्धन मतदार संघाचा सर्वांगीण विकास हे माझे ध्येय आहे. पर्यटनास पूरक नैसर्गिक सौंदर्याचा ठेवा अबाधित राखत पर्यटनाचा विकास करणे अगत्याचे आहे .चालू वर्षात निसर्गाने अवकृपा केली आहे त्यामुळे तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे त्यामुळे आगामी काळात नगरपालिकेने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. कोळी बांधवाच्या समस्या सोडवण्यात मी सदैव तत्परता दाखवली आहे .डिझेल प्रश्न ,मासेमारीची हद्द ,व इतर अनेक समस्या मी पालक मंत्री असताना सोडवल्या आहेत .मी सत्ता नसतांना विकासाला प्राधान्य दिले आहे विकास कामे करण्याची मानसिकता हवी असते .असे तटकरे यांनी सभेत सांगितले .सभेसाठी मोठया प्रमाणात कोळी समाज बांधव उपस्थित होते .त्या सोबत तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने, जितेंद्र सातनाक ,हरिदास वाघे ,मोहन वाघे ,ऋतुजा भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते .


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा