म्हसळयांत श्वसन विकाराच्या रुग्णांचे संखेत वाढ : विद्यार्थ्यांची संख्या जास्त.

फोटो : रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यकतेप्रमाणे पाणी न मारल्यामुळे वाहतुकीदरम्यान मोठया प्रमाणावर उडणारी धूळ छाया चित्रात दिसत आहे.



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
सातत्याने होणारा हवामानातील बदल, वायुप्रदूषण, नव्याने होत आसलेली बांधकांमे यामुळे तालुक्यांत मोठया प्रमाणात श्वसन विकाराची समस्या निर्माण होत आहे. रुग्णांमध्ये शालेय विद्याथ्यांचे प्रमाण जास्त आसल्याचे समजते .तालुक्यांत शुद्ध हवेचे प्रमाण चांगले असले तरी मोठया प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आसल्याने ग्रामिण भागांतून शहरांत येताना हवेतून येणारी धूळ यामुळे मोठया प्रमाणांत प्रदूषण वाढल्याने श्वसन विकार वाढत असल्याचे वैद्यकीय व्यवसायीकांचे म्हणणे आहे.तालुक्यातील बहुतांश शाळा या रस्त्यालगत आसल्याने त्याचाही परीणाम श्वसन विकार वाढीसाठी होत असतो. लहान मुले मोठयांच्या तुलनेत अधिक श्वासोच्छवास करत आसल्याने या विकारांत संसर्ग होण्याचे प्रमाण विद्यार्थी वर्गात जास्त असते. त्यातच दिवाळीतील फटाके वाजविल्याने फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास बळाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात दमा कर्करोगा सारखे आजार वाढण्याची संभावना जास्त असते.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC) माणगाव- म्हसळा- दिघी या मार्गावर दोन पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे मातीकाम सुरु असताना धूळ उडू नये म्हणून पाणी मारण्याची आर्थिक तरतूद असूनही ठेकदार निकषा प्रमाणे पाणी मारत नसल्याने रस्त्यावर  मोठया प्रमाणांत धूळीचे लोट उडत  असतात , आजूबाजूच्या शाळांत , घरांत मोठया प्रमाणात धूळीचे साम्राज्य होत असते.-महादेव पाटील, चेअरमन जिजामाता शिक्षण संस्था.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा