सुनिल तटकरे हे स्वताच्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करणारे नेते ; राष्ट्रवादी नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा राष्ट्रवादी नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा :म्हसळा भाजपची मागणी - म्हसळा भाजपची मागणी


फोटो - राष्ट्रवादी नेत्यांनी व पदाधिकाऱ्यानी शासनाचा योजनाचे बेकायदेशीर भूमीपुजन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून मागणी करताना भाजपचे तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, जिल्हा चिटणिस सरोज म्हशिलकर, जिल्हा का. सदस्य मंगेश म्हशिलकर, तालुका चिटणीस तुकाराम पाटील, म्हसळा शहर अध्यक्ष मंगेश मुंढे, महेश पाटील दिसत आहेत.


सुनिल तटकरे हे स्वताच्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करणारे नेते : मंत्री, आमदार नसतानाही मीच मंत्री असे भासवून विकासकामांचे भूमीपुजन करणाऱ्यां राष्ट्रवादी नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा :म्हसळा भाजपची  मागणी
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
म्हसळा तालुक्यासहीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री तथा माजी आमदार सुनिल तटकरे हे स्थानिक आमदार, पालकमंत्री व शासनाला विश्वासात न घेता भाजप सरकारने मंजुर केलेल्या कामाचे पाटीवर स्वताचे नाव लावून उदघाटन अथवा भूमीपुजन करत आहेत. तटकरे यांच्या कडे शासनाचे कोणतेही पद राहीले नसल्याने त्यांच्यावर व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यक्रमाचे व्यवस्थापकांवर फौजदारी  गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हसळा भाजपने केली आहे.  
सुनिल तटकरे हे आता मंत्री व आमदार देखील नसून त्याना या विकास कामांच्या भूमीपूजनाचे कोणतेही अधिकार राहीले नाहीत, तरीसुद्धा ते स्वताला मंत्री समजून भूमीपुजन करुण जनतेची दिशाभूल करत असल्यामुळे संबधित व्यक्ती व आयोजकांवर गुन्हे दाखल करा अन्यथा आम्ही राष्ट्रवादीने लावलेल्या खोटया व बेकायदेशीर  पाट्या तोडून टाकू असे निवेदन म्हसळा भाजपच्या वतिने म्हसळा पोलिस ठाण्यात देण्यात आले. यावेळी समन्वय समिती अध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, जिल्हा चिटणिस सरोज म्हशिलकर, जिल्हा का. सदस्य मंगेश म्हशिलकर, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष समिर धनसे,तालुका चिटणीस तुकाराम पाटील, म्हसळा शहर अध्यक्ष मंगेश मुंढे, महेश पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून उद्घाटन करताना भाजप सरकार कोणतेही काम करीत नाही असे वारंवार टिका करणारे सुनिल तटकरे  मात्र मुंख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे नाव ते फलकावर लिहतात तेच मुख्यमंत्री भाजपचे हे मात्र विसरतात आशी टिका भाजप तालुका अध्यक्ष शैलेश पटेल यांनी यावेळी केली.सुनिल तटकरे हे संधिसाधू  असून ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप श्रीवर्धन भाजप नेते कृष्णा कोबनाक यांनी केला असून, तटकरे यांनी शासनाच्या विकास कामाचे बेकायदेशीरपणे केलेले उदघाटन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुन्हा करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी दिली.

राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुनिल तटकरे जनतेची दिशाभूल करीत आहेत त्यांच्या शब्दाला बळी पडू नये.  त्यांच सरकार गेले त्याला चार वर्षे झाली आहेत व मागील चार वर्षांत भाजपा सरकार या मतदार संघात अनेक विकास कामे मतदार संघात सुरू केली आहेत, त्या कामांचे खोटी भुमिपुजने करुन जनतेला खोटे सांगत आहेत की ही सर्व कामे त्यांनी मंजूर करून घेतली,  हे सर्व खोटे आहे. खोटे बोल पण रेटून बोल  ही त्यांची सवय काही जाणार नाही. _- कृष्णा कोबनाक, अध्यक्ष श्रीवर्धन मतदारसंघ, भाजप

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा