म्हसळा वन विभागाने खैर तस्करी करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या : दोन वाहनांसह चौघाना घेतले ताब्यात गुन्हेगाराना तब्बल चार दिवसाची मिळाली कोठडी



संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा 

 म्हसळा तालुक्यातील वन विभागाने खैर तस्करी करणाऱ्यां टोळीच्या मुसक्या आवळून दोन वाहनांसह चौघाना  ताब्यात घेतल्याच्या घटनेची नोंद मांदाटणे परिमंडळात केल्याची माहीती एस.जी. म्हात्रे वनपाल मांदाटणे व एस.एस. चव्हाण वनरक्षक आंबेत यानी दिली . भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) अ,२६ (१) फ,२६ (१) ई, कलम४१ (१), ४१(२) ब, ४१(२) ई, ४२, ६५ अ चे उल्लंघन केल्याचा वन गुन्हा क्रमांक परिमंडळ मांदाटणे आ. टी./०२/सन २० १८-१९ गुन्हा नोंदवीला आहे.या गुन्ह्यात १)सतीश नथू साळुंखे . वय ३७ रां.धुत्रोली ता.मंडणगड २) सुमित संजय जंगम वय २१,रा. सोनगाव- पिंगळसई ता. रोहा, ३ ) रोहीत भगवान चव्हाण वय १९ रा. ,रा. सोनगाव- पिंगळसई ता. रोहा, ४) यशवंत चंदर जाधव वय ४७ रा. महागाव ता. रोहा या गुन्हेगाराना  वन विभागाने ताब्यात घेतले आहे. खैराच्या तस्करीसाठी वापरलेली महेंद्र बोलेरो पिकअप क्रं.एम.एच  .o६/ बी.जी.३९८०, बजाज पल्सर मोटर सायकल क्रं. एम.एच. ०८ / ए.एल. २८९१ ही दोन वाहने वनविभागाने ताब्यात घेतली आहेत.खैर तस्कराना  तब्बल चार दिवसाची फॉरेस्ट कोठडी मा. प्रथम श्रेणी न्यायालय श्रीवर्धन यानी दिली आहे. सदरचा खैर मुरुड तालुक्यातून आणला असल्याचे समजते.श्री राकेश सेपट उपवनसंरक्षक रोहा,श्री के व्ही गोडबोले सहा. वनसंरक्षक रोहा ,श्री एन.डी.पाटील वनक्षेत्रपाल म्हसळा यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई केल्याचे  वनपाल एस.जी. म्हात्रे व वनरक्षक एस.एस. चव्हाण आंबेत यानी सांगितले. यावेळी व्ही डी.पाटील वनरक्षक खामगाव ,एच.यु.बनसोडे वनरक्षक सरवर ,ए.बी. अहिरे  वनरक्षक कोंझरी ,एल.एन. इंगोले वनरक्षक कोंझरी यानी विशेष मदत केल्याचे एन.डी.पाटील वनक्षेत्रपाल म्हसळा यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा