श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
भारतीय समाजमनात खेळविषयी अनन्य साधारण प्रेम आहे.खेळ व कला यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे .आपल्या मातीत अनेक दर्जेदार खेळाडूची निर्मिती आपण करू शकतो. सक्षम खेळाडू बनवण्याची जबाबदारी पालक व समाज या दोन्ही घटकांची आहे असे प्रतिपादन संतोष मोहिते यांनी कराटे शिबिराच्या समारोप प्रसंगी केले .
आजमितीस देशात विविध खेळांसाठी पोषक वातावरण आहे. खो खो, कबड्डी,हॉकी व कराटे हे आपल्या मातीशी नाते सांगणारे खेळ आहेत .कराटे हा पाश्चात्य देशातील खेळ नसून तो आपला खेळ आहे फक्त त्याचा विकास व संवर्धन पाश्चात्य देशात झाले .योगा ही भारताने विश्वास दिलेली देणं आहे. योगा मध्ये बद्दल घडवून कराटे खेळाची निर्मिती केली गेली आहे. स्थानिक पातळी पासून ते राष्ट्रीय पातळीवर कराटे खेळ पोहचला आहे .भारतीय समाज मनात कराटे खेळा विषयी प्रचंड कुतुहलाचे वातावरण आज ही आहे .इंग्लिश मातीतील क्रिकेट चा आपल्या लोकांनी विकास घडवून आणला परंतु इतर खेळात आपली घसरण मोठया प्रमाणात झाली हे सत्य नाकारता येणार नाही. तरुणाईने विविध मैदानी खेळात नावीन्यतेचा स्वीकार करावा .कठोर मेहनत व जिद्दीने विविध खेळात नावलौकीक प्राप्त करावा असे संतोष मोहिते यांनी आपल्या मनोगतात म्हंटले .शिबीर सांगता प्रसंगी महाराष्ट्रातून विविध उत्कृष्ट मुख्य प्रशिक्षकां मधील महाड चे प्रसाद सावंत , मुबंई चे अमित दिवे ,पुणे अमित गिरीगोसावी ,विजय महाडिक व सातारा च्या तमन्ना रिनवा यांचा चॅपियन कराटे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला .रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसाद विचारे सचिव रितेश मुरकर ,कोषाध्यक्ष शैलेश ठाकूर व मुख्य प्रशिक्षक अविनाश मोरे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते .सदर शिबिरात रायगड जिल्ह्यातील म्हसळा ,माणगाव, महाड ,व श्रीवर्धन मधील 55 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
Post a Comment