फोटो : प्रतिमेचे पूजन करताना तहसीलदार झळके व अन्य अधिकारी
संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा तहसील कार्यालयात आज पंडीत जवाहरलाल नेहरू यांची १२९ वी जयंती तहसीलदार यांच्या दालनात साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन पूजन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार के.टी. भिंगारे, जितेंद्र टेंबे, सचिन घोंडगे, संतोष तावडे, विशाल भालेकर, प्रकाश भोईर , रामकृष्ण कोसबे, जयंता भस्मा, गोवींद चाटे, महेश रणदिवे, केशव कांबळे, श्रीमती सुचिता ऐनकर आदी कर्मचारी उपस्थित होते .
Post a Comment