तहसीलदार व सपोनी याना निवेदन देताना मुसद्दीक ईनामदार. व अन्य
संजय खांबेटे : म्हसळा
तालुक्यातील दिघी बंदरातुन फार मोठया प्रमाणात मालाची ने- आण करण्यासाठी ट्रेलर, टॅंकर, कंटेनरची अवजड वाहनांची वाहतुक होत असते. दिघी माणगाव पुणे या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे माणगाव - म्हसळा- दिघी या मुख्य टप्प्यांत महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळा तर्फ रस्त्याचे दुपदरी करणाचे काम सुरु आहे या दोनही मुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असल्याने दिघी पोर्टची वाहतुक तात्काळ बंद करावी अशी मागणी म्हसळा नवा नगर परिसरांतीत मुसद्दीक ईनामदार व अन्य नागरीकानी केली आहे. त्या बाबतचे निवेदन तहसीलदार रामदास झळके व सपोनी प्रविण कोल्हे याना देण्यात आले आहे वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घराना धोका होतो, नागरिकांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे ईनामदार यानी आपल्या अर्जात म्हटले आहे.तात्काळ वाहतुक बंद करून ८ दिवसाच्या आत योग्य निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करणार आसल्याचे ईनामदार यानी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment