श्रीवर्धनचा आंबा वाशीत दाखल ; ९७ वर्षीय आजोबांनी नातवाच्या मदतीने घेतले आंब्याचे उत्पादन



वैभव तोडणकर : आदणाव 
श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव गावातील ९७ वर्षीय काशिनाथ उर्फ आबा रामचंद्र मापुसकर यांनी आपला नातू अमोल मापुसकरच्या मदतीने नोव्हेंबर महिन्यात आंब्याचे उत्पादन घेऊन आंबा वाशी बाजारात पाठवला . याबद्दल संपूर्ण तालुक्यात मापुसकर यांचे कौतुक होत आहे . आपल्या सहा एकर जागेत हापूस , निलम , लंगडा , केशर पायरी , दशरी बाटली , मालगोवा , करंजा , वनराजा व मालदेसारख्या २५ हून अधिक प्रकारच्या आंब्याचे यशस्वी उत्पादन घेणाच्या मापुसकर यांनी यावर्षी विशेष नियोजन करत हापूसचे उत्पादन दरवर्षांपेक्षा २ ते ३ महिने आधी घेऊन नोव्हेंबर महिन्यातच आंबा वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवला . यापूर्वी सामाजिक क्षेत्रात काम करताना वयाच्या ८७ व्या वर्षी आदगाव गावचे तटामुक्त अध्यक्ष या पदावर काम करताना आदगाव गावाला प्रथम क्रमांकाचे ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळवून दिले होते . या वयातही अशा प्रकारची कामगिरी करून आबा मापूसकर यांनी समाजातील युवा पिढी समोर आदर्श ठेवला आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा