भित्तीपत्रकांची वाटते कार्यालयाना भिती : तालुक्यात मात्र भ्रष्टाचाराची आहे चलती.
संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
सरकारी खात्यांमध्ये सातत्याने वाढत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध उपाय योजना, विविध मार्गानी जनजागृती करीत असले तरी, रायगडचा
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हसळ्याला पोहचला नाही तर स्थानिक कार्यालय प्रमुखानी आपापल्या विभागात कोणत्याही पद्धतीने जनजागृती केल्याची माहीती उपलब्ध नाही . रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला म्हसळयाची अॅलर्जी आहे किंवा कसे अशी नागरीकांत खुली चर्चा आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने " लाच देऊ नका घेऊ नका "असा घराघरांत भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश देण्याचा संकल्प केला असला तरी म्हसळया पर्यंत घराघरांत संदेश पोहचला नसून काही कार्यालयांतून केवळ भित्तीपत्रके लावून संबधीत विभागाने वेळ मारून नेली.भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहात जिल्ह्यात काही तालुक्यांत दिनांक २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते, याच सप्ताहांत कार्यालयीन कामकाजात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्याबाबत आदेश होते परंतु तालुक्यातील कोणत्याही कार्यालयात अशा बाबत जनजागृती करण्यात आली नाही. पण भ्रष्टाचाराची लागण मात्र चांगलीच आहे.
तालुक्यांतील बहुतेक कार्यालयांतुन कामचुकार करण्याचा घेतात पगार तर काम करण्याची घेतली जाते लाच असे सर्रास धोरण झाले आहे, कार्यालयीन वेळेत आधिकारी कर्मचाऱ्यांरी व शिक्षक यांची दांडी असणे हा पण माझ्या मते भ्रष्टाचार आहे.तालुक्यातीत नगरपंचायत विभाग, ट्रेझरी, सामाजिक वनीकरण,महसुल व वन विभाग, दुय्यम निबंधक इत्यादी सर्वच खाती भ्रष्टाचार युक्तआहेत.
- महादेव पाटील , माजी सभापती.पं.स. म्हसळा.


Post a Comment