भाजपाची म्हसळ्यात महात्मा गांधी " स्वच्छता सेवा संवाद पद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात
संजय खांबेटे: म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुका भाजपाने आज महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पद यात्रेचे दुसऱ्या टप्प्याची सुखात रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा अध्यक्ष श्रीवर्धन विधान सभा मतदार संघ कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते केली ,यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, जिल्हा चिटणीस श्रीमती सरोज म्हशीलकर, प्रकाश रायकर,मिनाताई टिंगरे, मंगेश म्हशीलकर, गणेश बोर्ले, भालचंद्र करडे, मंगेश मुंडे ,अनिल टिंगरे, धनश्री मुंडे, समीर धनसे . राकेश हेलांडे, दिलीप कोबनाक, प्रशांत महाडीक, जयंत आवेरे, सुबोध पाटील वगैरे पदाधिकारी
उपस्थीत होते. दुसऱ्या टप्यात म्हसळा शहर ते मेंदडी या १० कि.मी. मधील शहर, गावे,वाडया, वस्तीतील नागरिकांपर्यत स्वच्छते सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केंद्रात व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी राज्यात साफ नियत व सही विकास हे सूत्र राबवित विविध योजना गरीब व सर्व सामान्यांसाठी कशा साकारल्या हे शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार असल्याचे कोबनाक यानी सांगीतले.
गरिबांपर्यंत विकास व सर्वांसाठी उत्तम रहाणीमान यामध्ये जनधन जन सुरक्षा योजना, प्रत्येक घरांत वीज.३.८ कुटुंबे उज्वला गॅस योजनेमुळे धूरमुक्त , कौशल्य विकासद्वारे १ कोटी युवकाना प्रशिक्षण , सुकन्या स्मृध्दी योजना , विनयभंग व बलात्कार करणा -या ना कठोर शिक्षा, हगणदारी मुक्त, पिक विमा योजना, अट्रासीटी कायद्याची अंमलबजावणी कठोर, गरीबांसाठी घरे,काळ्या पैशाला अटकाव , शेतकऱ्यासाठी नव्याने उभारलेली भात खरेदी केंद्र आशा अनेक योजना सर्वसामान्यांपर्यत आम्ही पोहचविणार आहोत असे कृष्णा कोबनाक यानी सांगितले.
तालुका समन्वय समीती गठीत : अध्यक्षपदी शैलेश पटेल
म्हसळा तालुका समन्वय समितीचे गठन झाले असल्याचे कोबनाक यानी जाहीर करून अध्यक्षपदी शैलशभाई पटेल व सदस्यपदी मंगेश म्हशीलकर, तुकाराम पाटील, धनश्री मुंडे, कल्पना कोठावळे व नंदकुमार सावंत यांची निवड झाल्याचे कोबनाक यानी जाहीर केले व संबधीतांचा सत्कार केला .


Post a Comment