प्रतिनिधी : श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यामध्ये १४ कोटी रूपये खर्च करून श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी धुप प्रतिबंधक बंधारा व सुशोभिकरण करण्यात आले . मात्र सद्य परिस्थितीत या ठिकाणी तोडफोड झालेली पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वच्छतेचाही बोजवारा उडाला आहे . त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्येही नाराजीचा सूर पसरला आहे श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी सुनिल तटकरे यांच्या संकल्पनेतून धुप प्रतिबधक बंधारा व त्याठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले . सार्वजनिक बांधकाम खात्याने या ठिकाणची सर्व कामे करून ते श्रीवर्धन नगरपालिकेच्या ताब्यात दिले . श्रीवर्धन नगरपालिकेने ठिकाणी कर्मचारी नेमून साफसफाई करण्याचे काम सुरु ठेवले होते . परंतु , आता मात्र त्या साफसफाईचा बोजवारा झाला आहे समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी आसनही बांधण्यात आलेली आहे . कचराकुंडीची व्यवस्था केली , पदपथावर दिवे लावण्यात आले परंतु , आता मात्र त्या ठिकाणी अगदी दुर्दशा झालेली पहायला मिळत आहे पदपथावरील काही ठिकाणी लाद्या फुटलेल्या असून पथदिव्यांची तोडफोड , कचरा कुंड्यांचीही बिकट परिस्थिती केलेली आहे ठिकाणी बांधण्यात आलेल्या छोट्या छोट्या तंबूचीही तोडफोड केलेली आहे पदपथावरील उभे असलेले स्टिलचे पाईपही गायब केलेले आहे . तसेच त्या पदपथावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असुन दारूच्या रिकाम्या बाटल्या , आजूबाजूला वाढलेली झाडेझुडुपे यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे एवढी घाण पसरलेली असूनही श्रीवर्धन नगरपालिका डोळेझाक करीत आहे . परिणामी पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागतो . श्रीवर्धन नगरपालिकेने त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी व त्या परिस्थिवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटिव्हीची देखिल व्यवस्था केलेली आहे . तरीसुध्दा अधी परिस्थिती आपणास पहायला मिळत असल्याने नागरिकांमधुन नाराजीचा सूर ऐकू येत आहे श्रीवर्धनचा स्वच्छ असा समुद्रकिनारा , नारळी - पोफळीची झाडे व स्मारक बघण्यासाठी तसेच श्रीवर्धन किनारा पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात . कोट्यवधी खर्च करून समुद्रकिनार्यावरील सुशोभिकरणाबाबत नगरपालिका प्रशासन उदासिन असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र नगरपालिकेने या गंभीर बाबींकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक व पर्यटकांकडून करण्यात आली आहे .
श्रीवर्धन समद्रकिनारी बांधण्यात आलेल्या धुपप्रतिबर्धक बंधारा व सशोभिकरणच्या ठिकाणच्या काही लाद्या या समुद्राच्या लाटाने फुटलेल्या आहे . तसेच काही ठिकाणी पथदिवे तुटलेले आहेत . लवकरात लवकर कामे केली जाईल असे सांगण्यात आले . तेथील साफसफाई करण्यासाठी कामगारांची व्यवस्था केलेली आहे.
-नरेंद्र भुसाणे , नगराध्यक्ष , श्रीवर्धन

Post a Comment