मत्स्य दुष्काळामुळे मच्छिमार आर्थिळ संकटात ; मच्छिमारांना कोंकण पॅकेज जाहीर करावे, मच्छिमार बांधवांची मागणी.


श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मत्स्य दुष्काळ जाणवत असल्याने मच्छिमार बांधव आर्थिक संकटात सापडला आहे . त्याचप्रमाणे मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणाच्या पुरक व्यवसायांवरही आर्थिक संकट कोसळले आहे त्यामुळे मच्छिमार बांधवांसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी मच्छिमार बांधवांकडून पुढे येत आहे जीवना कोळीवाडा मुळगाव कोळीवाडा , दांडा कोळीवाडा बांगमाडला भरडखोल , शेखाडी , दिवेआगर , आदगाव , कुडगाव , वेळास दिघी इत्यादी बांगमाडलाच्या टोकापासून ते दिघीच्या टोकापर्यंत मच्छिमार वस्ती आहे . तालुक्यामध्ये साधारणपणे १५०० ते २००० मच्छिमार यांत्रिक नौका त्याचप्रमाणे ५००ते १००० छोट्या मासेमारी नौका आहेत . तालुक्यामध्ये मासेमारीवर अधारीत ७ ते ८ आईस फैक्टरी असून छोटे - मोठे दुकानदार टैम्पो , रिक्षा , बैलगाडी , पिकअप , ट्रक अशाप्रकारे सुमारे १० ते १५ हजार लोकांचा उदरनिर्वाह या जीवनाकोळीवाडा जेटीवर होत असलेल्या मासेमारीच्या खरेदी विक्रीवर होत असतो . यावर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान फार कमी प्रमाणामध्ये मासेमारी झाल्याने आजची परिस्थिती पाहिली असता मच्छिमार नौकामालक हा आर्थिक संकटात सापडला आहे . मासेमारी करण्यासाठी मच्छिमार नौका मालक हा खोल समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी जात असतो . मात्र मासे फार कमी प्रमाणामध्ये मिळत असल्याने नौकेला मासेमारी करण्यासाठी होत असलेला खर्च देखील निघत नाही . त्यामुळे मच्छिमाराचे नौकामालक हे मेटाकुटीस आलेले दिसत आहे . काही दिवसांपूर्वी चक्रीवादळाच्या इशाच्याने नौका नांगरून ठेवल्या होत्या . त्यामुळे ऐन मासेमारीचा हंगाम वाया गेला . परंतु , त्यानंतरही मच्छिमारांच्या पदरी निराशाच आली आहे . वाढते जलप्रदुषण , पर्ससिन मासेमारी , एलईडी मासेमारीमुळे खोल समुद्रातही माशांचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मच्छिमार बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत . दुसऱ्या बाजूला मासेमारी व्यवसायावर अवलंबून असणार्या इतर व्यवसायांवरही मत्स्यदुष्काळामुळे संक्रांत आली आहे . त्यामुळे शासनाने या गोष्टीचा गांभिर्याने विचार करुन मच्छिमारांना कोकण पॅकेज देण्यात यावा अशी मागणी श्रीकृष्ण मच्छिमार सहकारी संस्थेचे माजी चेअरमन चंद्रकात वाघे यांनी केली असून सरकारने आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमांराना मदतीचा हात पुढे करावा , अशी मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा