जंजिरा किल्यावर तिरंगा फडकणार : २८ नोव्हेंबर रोजी होणार ध्वजारोहण


प्रतिनिधी : मुरुड 
महाराष्ट्रातील जंजिरा हा एकमेव किल्ला जेथे भगवा कधीच फडकला नाही . देशाच्या स्वातंत्र्यांनतर येथे तिरंगाही डोलला नाही . जनचळवळीच्या विजयानंतर एकदा तिरंगा फडकला . त्यालाही आता दशके लोटली आहेत . आता मात्र जंजिर्यावर कायमस्वरुपी तिरंगा फडकत राहणार आहे . पुणे येथील सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेच्या पाठपुरवठ्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यास मंजुरी दिली आहे.
सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वशंज रघुजीराजे आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ नोव्हेंबर रोजी या किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे यावेळी अनेक आमदारदेखील उपस्थित राहणार आहेत . भारतीय सागरी दुर्गाच्या इतिहासातील अभेद्य किल्ला म्हणून ओळखल्या जाणाच्या मुरुड येथील जंजिरा किल्ल्यावर आता तिरंगा फडकणार आहे . किल्ल्यावर भारतीय राष्ट्रध्वज कायमस्वरुपी फडकवण्यास पुरातत्व विभागाने अखेर मंजुरी दिली आहे . ध्वजसंहितेचे पालन करुन कायम स्वरूपी राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे . २ ऑगस्ट २०१८ रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या संचालकांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत . गेली अनेक वर्षे जंजिरा किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यास परवानगी मिळावी , अशी मागणी केली जात होती . काही शिवप्रेमींनी भगवा झेंडा किल्ल्यावर फडकवण्याचा प्रयत्न केला होता . मात्र त्यावेळी त्यास काही लोकांकडून विरोध झाला होता . अखेर किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा तोडगा काढण्यात आला . याबाबत पुणे येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने पुरातत्व विभागाकडे ध्वजारोहण करण्यासंदर्भात परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती . यानुसार किल्ल्यावर कायम स्वरुपी राष्ट्रध्वज फडकविण्यास मंजूरी देण्यात आली आहे येत्या २८ ऑक्टोबरला या किल्ल्यावर हे ध्वजारोहण केले जाणार आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा