मराठी संस्कृती प्रतिष्ठान ची स्वच्छता मोहीम ; श्री गणेश मुर्तींचे पुनश्च विसर्जन : श्रीवर्धन चा समुद्र किनारा स्वच्छ


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन शहरातील मराठी संस्कृती प्रतिष्ठान च्या सभासदांनी   समुद्र किनारी गणेशोत्सव समाप्ती नंतर    निर्माण झालेला कचरा , प्लास्टिक व पर्यावरणास हानिकारक वस्तू यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून समुद्र किनारा स्वच्छ केला आहे.प्रतिष्ठान च्या 50 सभासदांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदवला आहे . या मोहिमेत समुद्र किनारा चा जवळपास तीन किलोमीटर चा परिसर स्वच्छ करण्यात आला .गणेश विसर्जन  प्रसंगी लोकांनी टाकलेले अनेक वस्तु समुद्रास भरती प्रसंगी पुन्हा किनाऱ्यावर आल्या होत्या .त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते .प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी गणेश विसर्जन ना नंतर पुनश्च विसर्जनाचे काम करते .या वर्षी सुद्धा  समुद्र भरती नंतर किनाऱ्यावर आलेल्या लहान व मोठ्या सर्व  गणेश मुर्ती चे पुनश्च विसर्जन करण्यात आले .

         स्वच्छता मोहीमेत पर्यावरणा स हानिकारक असलेले प्लास्टिक ,तसेच बंदी असलेले थर्माकोल , निर्माल्य व उत्सव प्रसंगी वापरण्यात आलेली अनेक टाकाऊ वस्तू एका ट्रॅक्टर मध्ये भरून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली गेली .
 श्रीवर्धन शहरात पर्यटनास चालना मिळाली आहे त्यामुळे समुद्र किनारी सदैव पर्यटकांची गर्दी असते .त्यामुळे स्वच्छ समुद्र किनारा हा पर्यटक व्यवसायांसाठी आवश्यक आहे.


 मराठी संस्कृती प्रतिष्ठान  पर्यावरण पुरक भुमिका सदैव घेत असते .त्या नुसार आम्ही 3 किमी चा समुद्र किनारा स्वच्छ केला आहे. समुद्राच्या भरती मुळे   पाण्या बाहेर आलेल्या गणेश मूर्ती चे आज पुनश्च विसर्जन करण्यात आले .
  अमर गुरव (सभासद मराठी संस्कृती प्रतिष्ठान श्रीवर्धन )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा