गांधी जयंती निमित्त भाजपचा श्रीवर्धन मतदार संघात सफाई अभियान : १५० किलोमिटरच्या पदयात्रेने पदाधिकारी करणार भाजपचा प्रचार



म्हसळा(निकेश कोकचा )
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी श्रीवर्धन मतदारसंघात स्वच्छतेचा संदेश घेऊन १५० किलोमिटरची पदयात्रा काढणार असून या निमित्त भाजपचा प्रचार घरोघरी करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हयाचे भाजप उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी श्रीवर्धन मतदारसंघ उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, महिला अध्यक्ष सरोज म्हाशिलकर,म्हसळा तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, चिटणीस तुकाराम पाटील, अपाध्यक्ष भालचंद्र करडे, जिल्हा सदस्य मंगेश म्हशिकर, रायकर,महेश पाटील यांच्या साहीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आक्टोंबर ते जानेवारी असे चार महीने हि पदयात्रा टप्याटप्यानी सुरू राहणार असून या पदयात्रेला  महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा असे नाव देण्यात आले आहे. स्वच्छतेच्या पहिल्या टप्पांला म्हसळा शहरातून सुरवात करण्यात आली असून शहरातील ठिकठिकाणी स्वच्छता देखील कारण्यात आली.या यात्रेमध्ये ठरलेल्या दिवशी १० किलोमिटरचा पाई प्रवास करूण रस्त्यावर व यांत्रेदरम्यान येणाऱ्या गावांमधिल कचरा साफ करून स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे व १o किलोमिटरच्या अंतरावर येणाऱ्या प्रत्येक बुथ मध्ये भाजपचा प्रचार या माध्यमातून करणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष शैलेश पटेल यांनी दिली.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा