वाढत्या महागाई विरोधात म्हसळ्यामध्ये राष्ट्रवादीचे मौनव्रत आंदोलन


म्हसळा (निकेश कोकचा )
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या आदेशावरुण गांधी जयंतीनिमित्त म्हसळा तालुक्यात २ ऑक्टोंबर रोजी डिझेल, पेट्रोल, गॅस, लाईट बिल, एसटी भाडे व जिवनावश्यक वस्तू महाग केल्यामुळे  भाजप सरकारचा निषेध म्हणून सकाळी ९ ते १२ पर्यत ग्रामिण रुग्णालय प्रांगणात मौन आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक भाऊ करडे, तालुकाप्रमुख समिर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले,पं.स सदस्य मधु गायकर, उज्वला सावंत, नगराध्यक्षा फलक नाझ हुर्जुक, उपनगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी जीप सदस्य वैशाली सावंत, बांधकाम सभापती दिलीप कांबळे, सरपंच अंकुशखडस, नगरसेवक करण गायकवाड, संतोष काते यांच्यासहित अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा मौन आंदोलन संपताच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष समिर बनकर यांनी केंदियमंत्री अनंत गिते हे आता अवजड खासदार झाले असून रायगडमधून त्याना हद्दपार करणार असल्याची टिका केली. गरिब जनता महागाई मध्ये जळत असताना सरकार वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून जनतेला वेटीस धरत आहे. पुढील लोकसभा निवडणूकीत शिवरायांच्या राजधानी  रायगडमधून सुनिल तटकरेंना विजयी करुण महागाई वाढवणाऱ्या सरकारच्या परतीचा प्रवास जनता सुरु करेल असे मत सभापती छाया म्हात्रे यांनी आंदोलनाच्या सांगता प्रसंगी मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा