संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुका काँग्रेस कमेटीची सभा आज दिनांक ७/१०/२०१ ८ रोजी तालुका अध्यक्ष डॉक्टर मोईज शेख ह्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेला म्हसळा तालुक्यातील सर्व पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेमध्ये अनेक विषयायांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी वाहीद काजी, अ. सलाम हळदे, अकमल कादरी,रजीया परदेशी, अस्लम कादरी, अस्लम काजी , मुनीर दळवी, ईस्माईल हुर्जुक, इब्राहीम सोंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
२०१९ च्या लोकसभेसाठी व श्रीवर्धन ,महाड, पेण व पनवेल या विधानसभा जागांवर काँग्रेस (आय्)चा अधिकार आहे. ही तालुका काँग्रेसची मागणी आसल्याबाबत व पक्ष संघटना वाढी बाबत यावेळी विशेष चर्चा झाली.
यावेळीशहर उपाध्यक्ष म्हणून श्री आजित कळस आंबेत गण अध्यक्ष इसाक कौचाली म्हसळा तालुका संघटक सलीम धनसे पर्यावरण स्नेही अध्यक्ष म्हणून श्री शौकत घरटकर ह्यांची निवड करण्यात आली .
तालुका अध्यक्ष डॉ. मोईज शेख ह्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन स्वागत केले. यावेळी तालुका अध्यक्ष डॉ.मोईज शेख , उपाध्यक्ष रहीमतुल्ला मुकादम व शहर अध्यक्ष रफी घरटकर ह्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. व त्यांच्याशी संवाद साधला.पक्षांतील काही पदाधिकारी पक्षाचे कार्यक्रमांत सक्रीय नसतात त्यांचे बाबत वरीष्ठ पातळीवरून योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी आभ्यासू चर्चा झाली. पक्षातर्के मतदान जागृती अभियान व मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार आसल्याचे सांगण्यात आले.


Post a Comment