म्हसळ्यात आंधाराच्या फायद्यात घरातुन रु २२ हजाराचा माल घेऊन केला पोबारा.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
म्हसळा नवा नगर परीसरांत रात्रीच्या वेळी घर उघडे आहे याचा फायदा घेऊन चोरट्याने घरातुन रु २२ हजाराचा माल घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. नवानगर इदगाह मोहल्ला परीसरांतील बीलाल इमाम शेख यानी आपले रहात्या घरांतून HP कंपनीचा लॅपटॉप व सॅमसंग कंपनीचा मोबाईल एकूण  रु २२ हजाराचा एवज चोरीला गेल्याची फिर्याद  म्हसळा पोलीसांत दिल्याने  म्हसळा पोलीसाने गुरनं ३७/२०१८ भा.द.वी. ३८० प्रमाणे गुन्हयाची नोंद केली. शेख यांच्या घराचे काम सुरु आसल्याने रात्रीच्या वेळी  दरवाजे उघडेच होते अशी फिर्यादीने माहीती दिल्याचे तपासी अमलदार पो.ना .आनंद राठोड यानी सांगीतले. घटनेच्या ठीकाणी सपोनी प्रविण कोल्हे यानी तात्काळ भेट दिल्याचे राठोड यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा