श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीला धोका स्मशान भूमीसह शेत जमिनित शिरले पाणी ; स्थानिकांत भिती




श्रीवर्धन : वार्ताहर
श्रीवर्धन शहराला लाभलेला समुद्र किनारा दिवसेंदिवस धोक्याच्या कक्षेत असल्याचे दिसत आहे समुद्र किनारपट्टी दिवसेंदिवस गिळंकृत करत असल्याचे दिसत आहे . ठिकाणी स्मशानभूमीत पाणी शिरत आहे तसेच किनारपट्टी वरील वाळूचे ढिग दिवसेंदिवस वाढत्या पाण्याच्या लाटांमुळे नायनाट झालेले दिसत आहेत . श्रीवर्धनला लाभलेला समुद्रकिनारा दिवसेंदिवस पर्यटन दृष्ट्या प्रसिद्ध होत आहे त्याला आणखी जोड मिळाली ती माजी आमदार सुनौल तटकरे यांच्या प्रयत्नातून झालेल्या धूप प्रतिबंध बंधारा व समुद्र शुशोभिकरणाने मात्र १४ कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या भला भक्कम आसा बंधारा हा समुद्र किनाच्यावरील फक्त अडीच किलोमीटर इतकाच बांधण्यात आला आहे . तर उर्वरित अंदाजे सात किलोमीटरचा बंधारा आता धोक्याच्या कक्षेत असल्याचे दिसत आहे या भागातील छोट्या मोठ्या संख्येने पर्यटन व्यावसायिकांवर देखील याचा प्रकर्षाने परिणाम जाणवतो आहे . अडीज किलोमीटरचा बंधारा सोडून उर्वरित भागातील पुळण मातीचे मोठे मोठे ढीग ज्यांना डुंग किंवा दडे म्हणत हे डुंग पाण्याबरोबर वाहून गेले असून इतिहास जमा झाले आहेत . किनारपट्टी वरील शेती व नारळ सुपारीच्या बागा दिवसेंदिवस धोक्यात आल्या आहेत . काही शेत जमिनत समुद्राचे पाणी शिरले असून शेतजमिनी नापीक देखील झाल्याचे दिसत आहेत . तर उर्वरित शेत देखोल बेसावध क्षणांमध्ये पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही . सध्या समुद्र किनार्यावर समुद्राच्या पाण्यापासून गावाचे व किनारपट्टोचे रक्षण होण्यासाठी टाकण्यात आलेले दगडी बांध देखील समुद्राच्या लाटांच्या प्रवाहाने फुटत असून दांडा परिसरातील स्मशानभूमीत पाणी घुसत आहे समुद्रकिनारी लावण्यात आलेल्या सुरूच्या लागवडत जवळ जवळ किनारपट्टी सोडून १०० ते १५० मीटर आतमध्ये समुद्राचे पाणी घुसत आहे . त्यामुळे दिवसेंदिवस समुद्र किनारा गिळंकृत करत असून समुद्राचे पाणी लोकवस्तीत देखील घुसण्याची शक्यता नाकारता येणार नाही . दिवसेंदिवस भातशेतीत घुसत असलेल्या समुद्राच्या पाण्याकडे कोणत्याही प्रशासकीय अधिकार्याचे लक्ष केंद्रित झालेले दिसत नाही . या शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून मिळालेली नाही . मात्र लोकवस्तीत पाणी घुसून मोठी हानी होण्यापूर्वी प्रशासनाने समुद्रकिनारी पाण्याची गुसखोरे बंद करण्यासाठी उर्वरित किनारपट्टीवर देखील बंधारा बांधण्याची मागणी जोर धरत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा