संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
अनेक समस्यानी ग्रासलेले म्हसळा ग्रामिण रुग्णालयांतून नवशिक्या डॉक्टरांकडून रुग्णाना चुकीची ट्रिटमेंट होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत असतानाच ग्रामिण रुग्णालयात मृत जन्माला आलेल्या बाळाला डॉक्टरानी उपचारासाठी खाजगी डॉक्टरकडे पाठवून एक सोबत शासनाची व आपल्या गुणवत्तेचा पंचनामा केला.
सवीस्तर घटनाक्रम असा की काळसुरी येथील मयुरी राकेश भोपी वय २४ या महिलेला प्रसूतीसाठी म्हसळा ग्रामिण रुग्णालयात वडीलानी गुरु. दिं . ११ रोजी सकाळी दाखल केले असता सेवेत असणारे डॉ .बिलाल जस्नानी यानी महीलेची तब्बेत चांगली असून प्रसूती नॉर्मल होईल काळजी करण्यासारखे काहीही नाही असे पालकाना सांगितले . दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रसूती होईल असे सांगणाऱ्या डॉक्टरनी मृत आवस्थेत जन्माला आलेले बाळ खाजगी दवाखान्यात घेऊन जा असे सांगून बाळ नातलगांच्या ताब्यात दिले. खाजगी दवाखान्याचे डॉक्टर राऊत यानी बाळ पहाताच व पहाणी करताच हे मृत आहे असे सांगितले. महाराष्ट्र शासनाची हकेला साद देणारी आरोग्य सेवा का रुग्णाना मारणारी आरोग्य सेवा अशी म्हसळयात खुली चर्चा सुरू आहे.
मुलीला ग्रामिण रुग्णालयात अॅडमीट करताना रुग्णाची तब्बेत व सर्व व्यवस्थीत आहे. काळजी करू नका सांगणाऱ्या डॉक्टरनीच माझ्या बाळाचा जिव घेतला व कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या , मी पोलीसात या बाबत रीतसर तक्रार केली आहे.
देवदास श्रीधर सावकार. ( रुग्णाचे वडील) काळसुरी
बाळ जन्माला आल्यावर रडले का नाही असे विचारता डॉक्टर व नर्सचे बोलणेच बंद झाले. डॉक्टर व नर्स जोरा- जोरात पोट व अन्य भागावर मारीत होते.
यशोदा चाळके , रुग्ण महीलेचे नातलग
ग्रामिण रुग्णालय, म्हसळा याकडे शासन हेतूपुरस्कर दुर्लक्ष करते, रुग्णालयाला कायमस्वरूपी अधिक्षक अगर डॉक्टरांची नेमणूक न करता श्रीवर्धनच्या डॉ. ढवळेंकडे प्रभारी अधीक्षक व जसवली रुग्णालयातील वैयकीय अधिकाऱ्यांकडे प्रभारी चार्ज कशासाठी, म्हसळयासाठी स्वतंत्र अधिक्षक व वैद्यकीय आधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी.
महादेव पाटील, माजी सभापती. पं.स. म्हसळा

Post a Comment