संदीप पाटील : वारळ
श्री. गुरुदत्त मंडळ मोठी आळी वारळ -मुंबई (रजि. एफ - 17962) मंडळातर्फ सालाबादप्रमाणे याही वर्षी विजयादशमी - दसरा निमित्त स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन साई मंदिर,शिव शंकर नगर, वडाळा येथे करण्यात आले.सदर कार्यक्रमात स्कॉलरशिप, दहावी, बारावी, पदवीधर तसेच उच्च पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आलें असता, विशेष सत्कार म्हणून वयाच्या 47 व्या वर्षी देखील, शिक्षणाची जिद्द कायम ठेवत गेली 28 वर्ष प्रयत्नशील राहुन मेहनत घेतली आणि अखेर सन 2018 साली त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून पदवीधर परीक्षेत विजयी झाले, असे आमच्या मंडळाचे सह-सचिव श्री.यशवंत हरी पेरवी यांनी पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना एक आदर्श संदेश दिला आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे तरुण तडफदार कार्याध्यक्ष श्री. संदीप धो.पाटील सह मुंबई मंडळाचे अध्यक्ष.- रवींद्र रा. चाळके, डी.के.पाटील, सुरेश म्हात्रे,रमेश वारळकर,जनार्दन गौ.म्हात्रे, विलास पाटील, हरीचंद्र पयेर,गजानन म्हात्रे,जनार्दन ल.म्हात्रे, सुधीर वारळकर,रामचंद्र धो.टावरी, काशीनाथ म्हात्रे, सुधीर हि.म्हात्रे, हरीचंद्र हि. म्हात्रे,प्रशांत म्हात्रे,मंदार कांबळी, जनार्दन वारळकर,अनंत कविलकर,प्रभाकर पेरवी,सुधीर हि. म्हात्रे, विजय पाटील, नरेंद्र पाटील, विनोद पाटील आणि नितेश कविलकर इत्यादी व्यासपीठावरील मान्यवरांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करीत त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळातील बहुसंख्य कार्यकर्त्,जेष्ठ-श्रेष्ठ सभासद आणि विद्यार्थीवर्गांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात आपट्याच्या पानांची देवाण - घेवाण करीत स्नेहभावाने सदर कार्यक्रम आंनदाने पार पाडण्यात आला.

Post a Comment