बोर्लीपंचतनमध्ये विकासकामांचे भूमिपूजन ; बोर्लीपंचतन व नागाव मुस्लिम अध्यक्ष सेनेत


बोर्लीपंचतन : वार्ताहर
शिवसेना हा जातीयवादी पक्ष कधीच नव्हता व आताही नाही शिवसेनेमध्ये आलेल्या सर्वांची दखल पक्षाने घेतली असून जे आले ते कधीच पुन्हा गेले नाहीत असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले . बोर्ली पंचतन येथे छोटेखानी पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते . यावेळी बोर्लीपंचतन विभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले बोर्लीपंचतन येथील मुस्लिम कब्रस्तानाच्या संरक्षक भिंतीचे तसेच वडवली येथील महिला सभागृह उद्घाटन , आदगाव येथे सभामंडपाचे भूमिपूजन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री खा . अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्हा प्रमुख रवी मुंडे , माजी आ , तुकाराम सुर्वे , उपजिल्हा प्रमुख शामकांत भोकरे , तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर , सुकुमार तोंडलेकर , जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर , श्रीवर्धन सभापती मीना कुमार गाणेकर , अध्यक्ष मना मसूद दर्जा , बोर्ली पंचतन उपसभापती बाबुराव चोरघे , सुजित तांदळेकर , संदेश म्हसकर , सचिव कुणाल पेडणेकर , बोलपंचतन सरपंच गणेश पाटील ग्रामपंचायत सदस्य शब्बीर उर्दू , माजी सदस्य अबुकलां उंडे तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . यावेळी बोर्लीपंचतन येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम नागाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मसूद दर्जा यांच्या निवासस्थानी पार पडला . यामध्ये नागाव मुस्लिम समाजाचे मुस्लिम समाज अध्यक्ष असिफ परदेशी , लाईक दर्जी , महमद कौसर व इतर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमधून शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला . यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना . अनंत गीते यांनी सांगितले की , आपण विश्वासपूर्वक शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहात आपली दखल पक्ष निश्चितच ठेवेल . शिवसेना पक्षावर जातीयवादी पक्ष म्हणून टीका होत असते परंतु शिवसेना पक्ष कोणत्याही प्रकारे जातीयवादी नव्हता आणि नाही असे ठामपणे त्यांनी सांगितले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा