बोर्लीपंचतन येथे अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु ; मोहल्यातील रस्त्यासाठी ३ लाखांचा निधी...



बोर्ली पंचतन : वार्ताहर
येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मौलाना आझाद नगर येथे आदम हसवारे ते सलाम उंड्रे यांच्या घरापर्यंत अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रयत्नातून जिल्हा परीषदेच्या बांधकाम विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ३ लक्ष रूपये निधीच्या विकासकामाचे भूमिपूजन शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते व तालुका चिटणीस वसंत यादव यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. शेतकरी कामगार पक्ष हा जनसामान्यांचा कार्यशील पक्ष असून बोर्ली पंचतन युपग्रामपंचायतमध्ये एक दशक सत्तेमध्ये आहे . बोर्ली पंचतन येथील मौलाना आझाद नगर येथे आदम हसवारे ते सलाम उंड्रे यांच्या घरापर्यंत अंतर्गत रस्ता होणे अतीशय गरजेचे असल्याची मागणी येथील स्थानिकांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक युवक कार्यकर्ते अन्सार चोगल , अनिल पांगारे यांच्या कडे केली व त्यानुसार शेतकरी कामगार पक्षाने यासाठ जिल्हा परिषदेमार्फत निधी उपलब्ध करून देत ग्रामस्थांची मागणी पुर्ण करून देताना सदर अंतर्गत रस्त्यासाठो ३ लाख रूपयाचा निधो मंजूर करण्यात आला या रस्त्याचे भूमिपूजन तालुका चिटणीस वसंत यादव यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले याप्रसंगी उअमन हृदाद , राष्ट्रवादी नेते महमद मेमन , माजी सरपंच निवास गाणेकर , माजी उपसरपंच लिलाधर खोत , सुरेश धोपट अल्पसंख्यांक अध्यक्ष अन्सार चोगले , शहर चिटणीस अनिल पांगारे , विश्वास तोडणकर , चंद्रकांत धनावडे अमित पाटील शंकर गायकर , शाहीद उल्डे , दत्तात्रेय खोत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा