संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. सरल प्रणालीच्या माध्यमातून अर्ज भरण्याची सूचना मंडळाने केली आहे. मंडळाने अद्यापही परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले नाही.
अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर विलंबित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येतील. सरल प्रणालीमध्ये नोंद असणाऱ्या विद्यार्थ्यांचेच अर्ज वैध ठरणार असल्याने अकरावीमधील अनियमित प्रवेश समोर येणार आहेत..
mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. परीक्षेचे वेळापत्रक मात्र जाहीर केलेले नाही.

Post a Comment